जमीर काझी मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील पाणी टाकीची सफाई करताना महापालिकेच्या पाच कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रमजान महिना सुरू असताना मुस्लिम बहुल वस्तीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Nagpada accident)
हसीपाल शेख (वय १९ ), राजा शेख (२०), जियाउल्ला शेख (३६ ), इमांडू शेख (३८ ) अशी मृतांची नावे आहेत. तर पुरहान शेख ( ३१) याचे प्रकृती अत्त्यवस्थ असून त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nagpada accident)
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपाडाजवळील मिंट रोडवर गुड लक मोटार ट्रेनिंग स्कूल जवळ ‘बिस्मिल्ला स्पेस’ ही इमारत बांधण्यात येत आहे. बेसमेंट मध्ये पाण्याची टाकी असून ती अस्वच्छ असल्याने पालिकेचे पाच कंत्राटी कामगार रविवारी दुपारी स्वच्छता करण्यासाठी त्यात उतरले. पण पाण्याच्या टाकीतील दुर्गंधीमुळे कामगारांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध पडले. टाकीतून उतरलेल्या कामगारांकडून बाहेरील कामगारांना कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बांधकामावरील अन्य कामगारांना बोलावले. परिसरातील नागरिकही घटनास्थळी आले. नागरिकांनी तातडीने अग्निशामक दल व पोलिसांना याबाबत कळविले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्धवस्थेतील कामगारांना टाकीतून बाहेर काढले आणि जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चौघांजणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर पुरहाण शेख यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Nagpada accident)
मुंबई पालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर मोदींचा डोळा
उपराष्ट्रपती धनखड हॉस्पिटलमध्ये दाखल