Home » Blog » MVA agitation: महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा

MVA agitation: महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा

महाविकास आघाडीच्या आमदारांची निदर्शने

by प्रतिनिधी
0 comments
MVA agitation

मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर  यांच्या विरोधात बुधवारी (५ मार्च) महाविकास आघाडीच्याआमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.(MVA agitation)

 ‘कोश्यारी ते कोरटकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करी भाजप,’ ‘शिवरायांच्या इतिहासाची पाने लाख, कोरटकरला महाराष्ट्र मारतोय लाथ,’ ‘कोरटकरला पुरवली सुरक्षा, राज्य सरकारला द्या शिक्षा,’ अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. (MVA agitation)

एकीकडे इतिहासाचा अभ्यास नसताना राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर हे वादग्रस्त विधान करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. उलट त्यांनाच पोलीस सुरक्षा पुरवली जाते, याकडे लक्ष वेधत विरोधकांनी सरकारवर टीका केली. महाराजांचा अवमान करणाऱ्यांना राजाश्रय महायुती सरकार देत आहे, असा आरोपही विरोधकांनी केला.

हेही वाचा :

अबू आझमी विधानसभेतून निलंबित

भाजपच्या जयकुमार गोरेकडून महिलेचा छळ

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00