कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शहरातील सोलापुरे वसाहतीजवळच्या विहिरीत रविवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. (Murder)
तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याचे तपासात आढळले आहे. सोन्याच्या दागिन्यासाठी खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोभा सदाशिव धनवडे (वय ६२, रा. कचरा डेपोजवळ, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्यांना विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Murder)
विहिरीच्या काठावरील झाडाला त्यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. शोभा धनवडे यांच्या गळ्यात आणि कानात अंदाजे दहा तोळे वजनाचे आणि सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. सोन्याच्या दागिन्यांसाठी त्यांचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या गृहिणी असून पती, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासमवेत त्या रहात होत्या.
हेही वाचा :
अधिकारी भावंडांसह आईचा मृतदेह आढळला