Home » Blog » Vijay Hazare Trophy : मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाचे विजय

Vijay Hazare Trophy : मुंबई, महाराष्ट्र, विदर्भाचे विजय

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आगेकूच

by प्रतिनिधी
0 comments
Vijay Hazare Trophy

नवी मुंबई/अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही संघांनी विजय नोंदवले. मुंबईने अरुणाचल प्रदेशचा ९ विकेटनी पराभव केला, महाराष्ट्रानेही मेघालयला ९ विकेटनीच पराभूत केले. विदर्भाने छत्तीसगडला ८ विकेटनी हरवले. (Vijay Hazare Trophy)

अहमदाबाद येथे रंगलेल्या सामन्यात मुंबईने अरुणाचल प्रदेशचा डाव अवघ्या ७३ धावांत संपवला. अरुणाचलचे केवळ दोन फलंदाज वैयक्तिक दहा धावांचा टप्पा ओलांडू शकले. मुंबईच्या शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अथर्व अंकोलेकर या चार गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मुंबईने केवळ ५.३ षटकांत १ बाद ७७ धावा फटकावून विजय साकारला. मुंबईचा सलामीवीर आंग्क्रिश रघुवंशीने १८ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी केली. मुंबईचा हा दुसरा विजय असून ‘ग्रुप सी’मध्ये मुंबई ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Vijay Hazare Trophy)

दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मेघालयला ११३ धावांत गुंडाळले. मेघालयतर्फे अर्पित भटेवराने सर्वाधिक ३४ धावा केल्या. महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरने ३, तर रजनीश गुरबानी व सत्यजीत बच्छावने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. मेघालयचे माफक आव्हान महाराष्ट्राने १४.२ षटकांत १ बाद ११५ धावांसह पार केले. ओम भोसले व सिद्धेश वीर यांनी संघाला ९७ धावांची सलामी दिली. ओम बाद झाल्यावर सिद्धेशने राहुल त्रिपाठीसह विजयावर शिक्कामोर्तब केले. सिद्धेशने ६६ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ५७ धावा फटकावल्या. हा महाराष्ट्राचा तिसरा विजय असून ‘ग्रुप बी’मध्ये महाराष्ट्र १२ गुणांसह अग्रस्थानी आहे.

तिसऱ्या सामन्यामध्ये विदर्भाने छत्तीसगडला ८० धावांत रोखले. विदर्भाकडून यश ठाकूरने ४, तर हर्ष दुबेने ३ विकेट घेतल्या. विदर्भाने १८ षटकामध्ये २ बाद ८३ धावा करून विजय निश्चित केला. विदर्भातर्फे कर्णधार करुण नायरने ५२ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. यश राठोडने २८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद २८ धावा केल्या. ‘ग्रुप डी’मध्ये विदर्भ २ विजय व ८ गुणांसह आघाडीवर आहे. (Vijay Hazare Trophy)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00