Home » Blog » Monsoon : देशभर चांगला पाऊस पडणार

Monsoon : देशभर चांगला पाऊस पडणार

स्कायमेट चा १०३ टक्के पावसाचा अंदाज

by प्रतिनिधी
0 comments
Mansoon

नवी दिल्ली  : भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था स्कायमेटने मान्सून २०२५ चा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदाजात पाच ते सहा टक्के चढ उतार होण्याची शक्यता आहे. मान्सून काळात चार महिन्यांत ८६८.६  मिलिमीटर पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.  (Monsoon)

स्कायमेटचे जतिन सिंह म्हणाले, “ यावेळी ‘ला निना’ कमकुवत आणि कमी काळ राहणार आहे. तसेच पावसाला बाधा आणणारा एल निनो चा प्रभावही दिसणार नाही. एल निनो दक्षिणी दोलन (ENSO) न्यूट्रल राहील, ज्यामुळे मान्सूनला फायदा होईल. हिंदी महासागरातील स्थिती आणि सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (IOD) यामुळे पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे.” मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात (जुलै ते सप्टेंबर) पावसाचा जोर वाढेल, असाही अंदाज आहे. (Monsoon)

स्कायमेटनुसार, पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस पडेल. केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, गोवा आणि पश्चिम घाटात जास्त पाऊस अपेक्षित आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल, तर उत्तरेकडील राज्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Monsoon)

जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. या महिन्यात १०८ टक्के पाऊस पडणार आहे. सप्टेंबर महिन्यात १०४ टक्के पाऊस पडणार आहे. (Monsoon)

मान्सूनवर कशाचा परिणाम असतो

एल निनो आणि ला निना यांचा प्रभाव कमी असला तरी इंडियन ओशन डायपोल (IOD) सध्या प्रभावहीन आहे. तरीही त्याची सकारात्मक स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला फायदेशीर ठरेल. चार महिन्यांपैकी अर्धा काळ उलटल्यानंतर मान्सूनला अधिक गती मिळेल. स्कायमेटच्या अंदाजाने शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, यंदा पाऊस चांगला राहण्याची आशा वाढली आहे.

  • काय सांगतो स्कायमेटचा अंदाज…
  • देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला पाऊस
  • मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा बरसणार
  • पश्चिम घाट, प्रामुख्याने केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात जास्त पाऊस होणार
  • उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
  • जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहणार

हेही वाचा :

२६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?

 रेपो दर कपातीने कर्जदारांना दिलासा

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00