सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्नस स्टॉइनिसने गुरुवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या प्राथमिक ऑस्ट्रेलिया संघामध्ये त्याचे नाव होते. परंतु, त्याने या स्पर्धेतही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Marnus Stoinis)
यापुढे टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे ३५ वर्षीय स्टॉइनिसने म्हटले आहे. “ऑस्ट्रेलियाकडून वन-डे क्रिकेट खेळण्याचा प्रवास खूप सुंदर होता. या प्रवासातील प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु, वन-डेतून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले,” असे स्टॉइनिसने सांगितले. २०१५ साली वन-डे पदार्पण करणाऱ्या स्टॉइनिसने ७१ सामन्यांमध्ये १,४९५ धावा केल्या असून १ शतक व ६ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याच्या नावावर वन-डेमध्ये ४८ विकेटही जमा आहेत. २०२३ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो सदस्य होता. (Marnus Stoinis)
नोव्हेंबर, २०२४ मध्ये स्टॉइनिस अखेरचा वन-डे सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याला केवळ ८ धावा करता आल्या होत्या. (Marnus Stoinis)
हेही वाचा :