Home » Blog » Market disaster : पहिल्याच दिवशी बाजारात आपटबार !

Market disaster : पहिल्याच दिवशी बाजारात आपटबार !

गुंतवणूकदारांना नऊ लाख कोटींचा फटका  

by प्रतिनिधी
0 comments
Market disaster

मुंबई : प्रतिनिधी : सोमवारी (दि. २७ जानेवारी) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला. दोन तासांत बीएसई सेन्सेक्स ८०० अंकानी घसरला तर निफ्टी ५०,२२,९०० पर्यंत खाली होता. पहिल्या सत्रातील घसरणीनंतर दुसऱ्या सत्रातही घसरणीचा कल पहायला मिळाला. कमजोर कॉर्पोरेट इन्कम,  अमेरिकन व्यापार धोरणातील चिंता आणि परकीय गुंतवणूकदारांनी लावलेला विक्रीचा धडाका यामुळे शेअर बाजारावर कमालीचा परिणाम दिसू लागला आहे. दोन तासात गुंतवणूकदारांना नऊ लाख कोटींचा फटका बसला आहे.(Market disaster)

सोमवारी सकाळी संन्सेक्स ४९० अंकांनी घसरुन ७५,७००.४३ वर खुला झाला. त्यानंतरही घररण सुरूच राहिली. सकाळी अकरा वाजता सेन्सेक्स ८४२ अंकापर्यंत घसरला. निफ्टीही सुरुवातीला १५० अंकांनी घसरला. ११ वाजेपर्यंत २६५ अंकाची घरसण झाली होती. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना नऊ लाख कोटीचा फटका बसला. पहिल्या दोन तासांत झोमॅटो, इंडसइंड बँक, एमएंडएम, अदानी पोर्टस्, इन्फोसिस आणि टाटा स्टिलच्या शेअरमध्ये खूपच घसरण झाली. किमान दोन टक्के नुकसान झाले आहे. बीएसई सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ९.४८ लाख कोटी रुपयांनी घटून ४१०.०३ लाख कोटीवर पोहचले आहे, असे ‘इटी’ अहवालात म्हटले आहे. (Market disaster)

अमेरिकन धोरणांचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी सुरू केलेल्या घोषणांचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटत आहेत. ट्रम्प यांनी कोलंबीया देशावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. शिवाय कोलंबियाने निर्वासित स्थलांतरितांना स्वीकारण्यास नकार दिला आहे. या तणावाचे पडसाद शेअर बाजारावर पडले आहेत. कोलंबियांने काही अटीशिवाय स्थलांतरितांना स्वीकारण्याचे मान्य केले असले तरी एक फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोवरील संभाव्य शुल्काबाबत निर्माण झालेल्या चिंतेचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. (Market disaster)

फेडरल रिझर्व्हच्या बुधवारी होणाऱ्या दर निर्णयाची वाट गुंतवणूकदार पहात आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या विक्रीचा ट्रेंड सुरू ठेवला आहे. २४ जानेवारीपर्यंत ६४ हजार १५६ कोटी रुपयांच्या समभागांची वक्री केली आहे. यूएस टॅरिफच्या संदर्भात जागतिक बाजारातील अनिश्चितीमुळे डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर इंडेक्स २.२१ टक्के वाढून १०७.६६ वर पोहोचला आहे.

हेही वाचा :
अर्थसंकल्पातील प्रकल्पांचे पुढे काय होते?
अर्थसंकल्पाचा हलवा कशासाठी तयार केला जातो ?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00