Home » Blog » Market Crash : शेअर बाजाराला पाच लाख कोटींचा फटका

Market Crash : शेअर बाजाराला पाच लाख कोटींचा फटका

ट्रम्प इफेक्टने दिला मोठा हादरा

by प्रतिनिधी
0 comments
Market Crash

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय शेअर बाजाराला मंगळवारी, २१ जानेवारीला ट्रम्प इफेक्टने हादरा दिला. शेअर बाजार १,२०० अंकांनी कोसळला, तर निफ्टीही कमालीचा घसरला. दुपारी पावणेतीनच्या सुमारास  बीएसई सेन्सेक्स १,२६२ अंकांनी किंवा १.६४ टक्क्यांनी घसरत ७५,८११.५९ वर व्यापार करत होता. निफ्टी५०३३१ अंकांनी किंवा १.४२ टक्क्यांनी घसरून २३,०१३.३० वर होता. (Market Crash)

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि झोमॅटो समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख इक्विटी निर्देशांक घसरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगतच्या राष्ट्रांवरील व्यापार शुल्क लादण्याची घोषणा केली. त्याचे परिणाम बाजारावर झाले आणि बाजारात सावध पावले उचलली गेल्याचे स्पष्ट झाले.(Market Crash)

त्याची परिणती बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य रु. ५.२१ लाख कोटींनी कमी झाले. ते ४२६.३८ लाख कोटी झाले, असे ‘इटी’ अहवालात म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयात मालावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले. झोमॅटोच्या शेअरची किंमत ११ टक्क्यांनी उतरली. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या कंसोलिडेटेड नेट प्रॉफिटमध्ये ५७ टक्के घसरण दिसून आली आहे.(Market Crash)

रिलायन्स इंडस्ट्रिज, अदानी पोर्टस्, एनटीपीसी आणि एसबीआर्य शेअर दोन टक्के उतरले आहेत. तर दुसरीकडे अल्ट्राट्रेक सिमेंट, सन फार्मा, टाटा मोटर्स, एचसीएल टेक आणि टेक महिंद्राच्या शेअर सुरवातीपासून उचल खात आहेत. शेअरबाजार कोसळल्याने बीएसई लिस्टेड सर्व कंपन्याच्या मार्केट कॅपमध्ये ५.२१ लाख रुपये घटून ४२६.३८ लाख करोड रुपयावर पोहोचला आहे.(Market Crash)

मंगळवारी सकाळी अकरा वाजता सेंसेक्स ७०३.१५ अंक म्हणजेच .०९१ टक्कयापासून ७६.३७०.२९ अंकावर ट्रेंड करत होता. निफ्टी ५० इंडेक्स १६२.९५ अंक म्हणजे ०.७ टक्के खाली उतरुन २३,१८१.८० अंकावर होता. व्यक्तीगत शेअरमध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीजमध्ये तिसरी तिमाहीच्या अहवालानंतर ८.५ टक्के घसरण दिसून आली. अमेरिका बाजार सोमवारी बंद होता. ट्रमप यांनी शपथ घेतल्यानंतर मंगळवारी अशियाई बाजारात नाराजीचे सूर उमटले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00