सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीला समर्थन दिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही इथून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रक्रियेविषयी लोकांना शंका असेल तर ती तशीच रेटून नेणे लोकशाहीविरोधी आहे. देश किंवा राज्याचे सरकार ठरवणा-या निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हायच्या असतील, त्यावरील लोकांचा विश्वास बळकट व्हायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी मान्य व्हायला हवी.
मारकडवाडीचा संदेश
निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हायच्या असतील, त्यावरील लोकांचा विश्वास बळकट व्हायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी मान्य व्हायला हवी.
12
previous post