महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक आल्यामुळे तर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. (Madhukarrao Pichad)
मधुकर पिचड यांनी १९८० ते २०१९ पर्यंत अकोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून सलग सातवेळा प्रतिनिधीत्व केले होते. १९८० मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ते आमदार झाले. १९९१ मध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात ते आदीवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते. तर शरद पवार मुख्यमंत्री असताना दुग्ध विकास मंत्री होते. १९९५ ते १९९९ या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. १९९९ मध्ये परत त्यांच्याकडे आदीवासी विकास मंत्रालयाची धुरा आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. २०१९ मध्ये त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वाढते वयोमान आणि आजारीपणामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात ते सक्रीय नव्हते.
हेही वाचा :
- अभिनेत्रीच्या बहिणीने प्रियकराला जाळून मारले
- सुटका झाली, पण आता एकटे जायला भीती वाटते…
- ९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!