Home » Blog » Leelawati Hospital: ‘लीलावती’मध्ये काळी जादू

Leelawati Hospital: ‘लीलावती’मध्ये काळी जादू

माजी विश्वस्तांनी बाराशे कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Leelawati Hospital

मुंबई : प्रतिनिधी : येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये विश्वस्तांनी काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या माजी विश्वस्तांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रुग्णालयाचे विद्यमान कार्यकारी संचालक परमबीर सिंग आणि लीलावती रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी केला आहे. या दोघांनी माजी विश्वस्ताशी संबंधित १२०० कोटींच्या घोटाळ्याबाबत वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रुग्णालयात काळी जादू केल्याचा प्रकारही उघडकीस आल्याचे सांगितले. या माजी विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.(Leelawati Hospital)

आरोपींमध्ये रुग्णालयाचे माजी विश्वस्त आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अनियमितता, फेरफार आणि निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान हा अपहार उघडकीस आला होता.

सध्याच्या विश्वस्तांच्या तक्रारीवरून ६ मार्च रोजी नोंदवलेला एफआयआर पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करण्यात आला आहे. (Leelawati Hospital)

एफआयआरनुसार, सध्याच्या विश्वस्तांनी एलकेएमएमचा ताबा २०२३ मध्ये घेतला. त्यानंतर या आधीच्या ट्रस्टींनी त्यांच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचे त्यांनी उघड केले. सविस्तर फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे ऑफशोअर खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूक आणि आरोपींनी अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचे उघड झाले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. (Leelawati Hospital)

तक्रारीत म्हटले आहे की, या कथित गैरव्यवहारामुळे ट्रस्टच्या कामकाजावर आणि लीलावती हॉस्पिटलद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांवर परिणाम झाला आहे.

फॉरेन्सिक ऑडिटच्या निष्कर्षांच्या आधारे स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. (Leelawati Hospital)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि हॉस्पिटलमध्ये कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की ट्रस्टच्या कार्यालयाच्या फरशीखाली मानवी अवशेष (हाडे आणि केस) असलेले आठ कलश सापडले. या वस्तू सील करून पोलिसांना पाठवण्यात आल्या. सिंह यांनी सांगितले की, गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेले माजी विश्वस्त सध्या बेल्जियम आणि दुबई, यूएई येथे आहेत. (Leelawati Hospital)

‘‘फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान उघडकीस आलेला हा मोठा आर्थिक गैरव्यवहार हा केवळ या कथित आणि फसव्या माजी विश्वस्तांनी केलेला विश्वासघात नाही तर आमच्या रुग्णालयाच्या ध्येयासाठी थेट धोका आहे,’’ असे मेहता यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरले जाईल. आम्ही अंमलबजावणी संचालनालयाला या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जलद आणि निर्णायक कारवाई करण्यासाठी विनंती करतो,’’ असेही मेहता यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :
‘जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक

युध्द विरामासाठी युक्रेन तयार

२७ बलुची बंडखोरांचा खात्मा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00