चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामरा यांना ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीबद्दल मुंबईत एफआयआर दाखल झाला आहे. कामरांनी जामीनासाठी मद्रास उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने कामरा यांना दिलासा देत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जामीन अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे.(kunal kamra bail)
मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाला असला तरी, कामरा तामिळनाडूचा रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांनी तेथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘नया भारत’ या नवीन स्टँड-अप व्हिडिओच्या प्रसारणानंतर कामरा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, याकडे कामरा यांचे वकील व्ही. सुरेश यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. (kunal kamra bail)
न्यायमूर्ती सुंदर मोहन म्हणाले की, कामरा यांना संरक्षणासाठी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाता येत नाही हे लक्षात येते. त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत आहोत. न्यायालयाने खार पोलिस स्टेशनला (या प्रकरणातील दुसरा प्रतिवादी) खाजगी नोटीस पाठवण्यास परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीबद्दल मुंबईत दाखल झालेल्या एफआयआरच्या संदर्भात कामरा यांनी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ते तामिळनाडूतील विल्लुपुरम शहरातील कायमचे रहिवासी आहेत. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे, असा दावा कोर्टात करण्यात आला. तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावर सुनावणी घेण्यात आली. (kunal kamra bail)
कुणाल कामरा यांनी प्राथमिकदृष्ट्या मद्रास उच्च न्यायालयाला खात्री पटवून दिली की ते संरक्षणासाठी महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाहीत. या प्रकरणात कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील मंत्री आणि पक्षाचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याने कामरा जामीनासाठी येथील न्यायालयांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन नंतर मागितला जाईल.
– मद्रास उच्च न्यायालय
शिवसेनेचे आमदार मुराजी पटेल यांनी कामरा यांच्याविरुद्ध कलम ३५३(१)(ब), ३५३(२) [सार्वजनिक गैरवर्तन] आणि ३५६(२) [बदनामी] बीएनएस अंतर्गत शून्य एफआयआर दाखल केला होता. नंतर हा एफआयआर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतले नसले तरी, शिवसेनेतून फुटल्याचा संदर्भ देताना त्यांनी शिंदे यांना देशद्रोही म्हटले असल्याचा पक्ष कार्यकर्त्यांचा आरोप आहे. (kunal kamra bail)
कामरांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. कामरा यांचा कार्यक्रम याच स्टुडिओमध्ये झाला होता. या हिंसाचारप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
कामराची बाजू ॲड. व्ही. सुरेश आणि अश्विन थूल यांनी मांडली. राज्य सरकारची बाजू अतिरिक्त सरकारी वकील संतोष यांनी मांडली.
हेही वाचा :
कोरटकरवर कोर्टात हल्ला
विरोध निष्फळ, न्या. वर्मा यांची बदली