कोल्हापूर : प्रतिनिधी : शेकडो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्टेडियम झालेल्या शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. आजच्या विजयाने पाटाकडील संघाचे १५ गुण झाल्याने त्यांनी शाहू छत्रपती लिग स्पर्धा जिंकली. १४ गुण मिळवणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले होते. ( KSA football)
विजेत्या पाटाकडील संघास रोख एक लाख रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या शिवाजी संघास रोख ७५ हजार आणि चषक, तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या खंडोबा तालीम मंडळ संघास ५० हजार तर बालगोपाल तालीम मंडळास २५ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.
लिग स्पर्धेतील आज रविवारी पाटाकडील आणि शिवाजी यांच्यातील अंतिम सामना होता. विजेतेपदासाठी पाटाकडील संघास विजय आवश्यक होता तर शिवाजी संघास बरोबरी आवश्यक होती. त्यामुळे दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार सुट्टीचा वार असल्याने तमाम फुटबॉल शौकिनांनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मैदान खचाखच भरले होते. प्रेक्षक गॅलरी तुडुंब भरल्याने शेकडो फुटबॉल शौकिनांनी मैदानावर बसून सामन्याचा आनंद लुटला.( KSA football)
पाटाकडील आणि शिवाजी यांच्यातील संडे ब्लॉक बस्टर सामना असल्याने दोन्ही संघांनी सुरवातीपासून ईर्ष्येने खेळ केला. पूर्वार्धात शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे, खुर्शीद अली, संकेत साळोखे तर पाटाकडीलकडून ऋषीकेश मेथे, प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे यांच्या चढाया दाद मिळवणाऱ्या ठरल्या. पूर्वाधात दोन्ही संघ गोल न करु शकल्याने गोलफलक कोरा होता. ( KSA football)
उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडीसाठी प्रयत्न करत होते. पण शिवाजीचा संघ बचावत्मक खेळ करत होता. ६९ व्या मिनिटाला पाटाकडीलला फ्री कीक मिळाली. यावर पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे अचूक हेडरद्वारे चेंडूला जाळ्याची दिशा दाखवली. गोलरक्षक मयुरेश चौगुलेला बचाव करण्याची संधी मिळाली. या गोलनंतर पाटाकडीलच्या समर्थकांनी जल्लोष केला. परतफेड करण्यासाठी शिवाजीने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात चढाया केल्या पण पाटाकडीलने भक्कम बचाव केला. जादा सात मिनिटातही शिवाजीला गोल करता आला. सामना संपल्याची पंचांनी शिट्टी वाजवतानच पाटाकडीलच्या खेळाडू आणि समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

KSA football
बक्षिस वितरण पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आमदार रोहित पाटील, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि विफाचे पदाधिकारी, केएसए अध्यक्ष मालोजीराजे, विफा महिला फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, विफाचे सचिव किरण चौगुले, साजीद अन्सारी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजयकुमार झाडे, केएसएचे उपाध्यक्ष बाळासाहेब नचिते, सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने, नंदकुमार बामणे, विश्वास मालेकर, संभाजी मांगोरे पाटील, भाऊ घोडके, मनोज जाधव, उद्योगपती तेज घाटगे, ध्रुव मोहिते, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, इंद्रजित सलगर आदी उपस्थित होते. ( KSA football)
हेही वाचा :
इंग्लंडचा भारतावर विजय
आयपीएलचा अंतिम सामना ‘इडन गार्डन्स’वर