कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाला दिलबहार तालीम मंडळाने १-१ असे बरोबरीत रोखले. दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने बीजीएम स्पोर्टस् वर २-० असा विजय मिळवला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (KSA Football)
पाटाकडील आणि दिलबहार यांच्यातील सामना पाहण्यासाठी शुक्रवारी फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता. उत्तरार्धात पाटाकडीलला सामन्यात आघाडी मिळवण्यात यश आले. ४५ व्या मिनिटाला संदेश कासारने गोल केला. गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारने जोरदार चढाया केल्या. ५७ व्या मिनिटाला परतफेड करण्यासाठी संधी मिळाली. स्वयंम साळोखेने सफाईदार गोलची नोंद केली. पूर्णवेळेत दोन्ही संघ गोल करु न शकल्याने सामना १-१ बरोबरीत सुटला.(KSA Football)
प्रॅक्टिस आणि बीजीएम स्पोर्टस् यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ गोल न करु न शकल्याने सामना शून्य गोलबरोबरीत होता. उत्तरार्धात ५० व्या मिनिटाला सागर चिलेने गोल केला. ६२ व्या मिनिटाला अनिकेत कोळीने गोल करत संघाची आघाडी वाढवली. दोन गोलची आघाडी कायम टिकवत प्रॅक्टिसने सामना जिंकल्या. त्याच्या नावावर तीन गुण जमा झाले.
- शनिवारचे सामने
- झुंजार क्लब वि. वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी दोन वाजता.
- खंडोबा तालीम मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस्, दुपारी चार वाजता.
हेही वाचा :
स्वप्नील कुसाळेला अर्जून पुरस्कार