कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी खासदार महाडिक यांनी मुलाला समजून सांगितले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. (Kolhapur Politics)
टीव्ही 9 शी बोलताना राजेश क्षीरसागर यांना, कोल्हापूर उत्तर मध्ये कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे असा प्रश्न केला असता ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भरपूर विकास कामे केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी माझा मुलगा ऋतुराज क्षीरसागर याने पाच हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानेही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. पण मी त्याला समजून सांगितले आहे. (Kolhapur Politics)
महायुतीतील नेत्यांनी मतभेद होईल असे वागू नये. जिथे काँग्रेस प्रबळ आहे तिथे महायुतीतील सर्वांनी ताकदीने लढायचे आहे. आपापसात आडवं यायची संस्कृती बदलली पाहिजे. महायुती एकत्र लढणार असल्याने मी जसे माझ्या मुलाला समजून सांगितले तसे खासदार महाडिक यांनी त्यांच्या मुलाला समजून सांगितले पाहिजे असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी दिला.
इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वाना आहे पण ती मागणी योग्य रितीने, दुजाभाव, मतभेद होता कामा नये याचीही काळजी घेतली पाहिजे, असे सांगत राजेश क्षीरसागर म्हणाले, मी सलग दोन वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो आहे. गेल्या पाच वर्षात मी लोकांच्या मदतीला धाऊन गेलो असून जिल्ह्यासाठी मोठा निधी आणला आहे. जनतेने मला स्वीकारले असून सर्व्हेमध्ये माझे नाव सर्वात पुढे आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये तिकीट कुणाला मिळणार याचा मी विचार केला नसून मी निवडणूकीच्या तयारीला लागलो आहे.
हेही वाचा :
- Rankala lake : रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारणार : राजेश क्षीरसागर
- ८०० ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना
- Navratri Festival : श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात