गॉल : उस्मान ख्वाजाचे द्विशतक आणि जोश इंग्लिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात ६ बाद ६५४ धावांचा उभारला. यानंतर, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत यजमान श्रीलंकेने पहिल्या डावामध्ये ३ बाद ४४ धावा केल्या होत्या. श्रीलंका अद्याप ६१० धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना आणखी ४११ धावांची आवश्यकता आहे. (Khawaja)
या कसोटीमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद ३३० धावा केल्या होत्या. बुधवारी नाबाद राहिलेल्या ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी गुरुवारी पहिल्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २६६ धावा जोडल्या. ही ऑस्ट्रेलियातर्फे श्रीलंकेच्या भूमीवरील सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी शॉन मार्श व माइक हसी यांनी २०११ मध्ये चौथ्या विकेटसाठी रचलेल्या २५८ धावांचा विक्रम मागे टाकला. शंभराव्या षटकात वाँडरसेने स्मिथला बाद करून दिवसातील पहिली विकेट मिळवली. स्मिथ २५१ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकारांसह १४१ धावा करून बाद झाला. (Khawaja)
त्यानंतर, ख्वाजाने कसोटी पदार्पण करणाऱ्या इंग्लिससोबतही शतकी भागीदारी केली. यादरम्यान, ख्वाजाने कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक झळकावले. ख्वाजाने ३५२ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व एका षटकारासह २३२ धावांची खेळी केली. इंग्लिसने पदार्पणात कसोटी शतक झळकावताना ९४ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह १०२ धावांची खेळी केली. ६ बाद ६५४ धावांवर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. ही ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने १९९५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ बाद ६१७ धावा केल्या होत्या. (Khawaja)
अखेरच्या सत्रात फलंदाजीस आलेल्या श्रीलंकेने झटपट तीन विकेट गमावल्या. ओशादा फर्नांडो (७), दिमुथ करुणरत्ने (७) आणि अँजलो मॅथ्यूज (७) हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. खेळ थांबला, तेव्हा दिनेश चंदिमल ९, तर कमिंदू मेंडिस १३ धावांवर खेळत होते. (Khawaja)
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव १५४ षटकांत ६ बाद ६५४ (उस्मान ख्वाजा २३२, स्टीव्ह स्मिथ १४१, जोश इंग्लिस १०२, प्रबथ जयसूर्या ३-१९३, जेफ्री वाँडरसे ३-१८२) विरुद्ध श्रीलंका – पहिला डाव १५ षटकांत ३ बाद ४४ (कमिंदू मेंडिस खेळत आहे १३, मिचेल स्टार्क १-१०).
Usman Khawaja is the third-oldest to score a Test double-hundred in the 21st century
#SLvAUS pic.twitter.com/30YwjkqoRj
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 30, 2025
हेही वाचा :