Home » Blog » Kavin Pietersen : केविन पीटरसन ‘दिल्ली कॅपिटल्स’चे ‘मेंटॉर’

Kavin Pietersen : केविन पीटरसन ‘दिल्ली कॅपिटल्स’चे ‘मेंटॉर’

कर्णधाराच्या नावाची मात्र अद्याप प्रतीक्षाच

by प्रतिनिधी
0 comments
Kavin Pietersen

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२५च्या मोसमासाठी केविन पीटरसन यांची मेंटॉर म्हणून नेमणूक केली आहे. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार असणारे ४४ वर्षीय पीटरसन आयपीएलमध्ये प्रथमच मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील. (Kavin Pietersen)

दिल्लीच्या प्रशिक्षक वर्गामध्ये हेमांग बदानी (मुख्य प्रशिक्षक), मॅथ्यू मॉट (सहायक प्रशिक्षक), वेणूगोपाळ राव आणि मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. राव हे संघाचे क्रिकेट संचालक असून मुनाफ गोलंदाजी प्रशिक्षक आहे. आता त्यांच्यासोबत पीटरसन हे संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करतील. “कॅपिटल्ससाठी मेंटॉर म्हणून काम करणे ही माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक संधी आहे. संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यासाठी मला शक्य ते सर्वकाही मी करेन. दिल्ली संघाकडून खेळण्याच्या माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आता पुन्हा त्या संघासोबत काम करायला मिळणे हे आनंददायी आहे,” अशी प्रतिक्रिया पीटरसन यांनी नेमणुकीच्या घोषणेनंतर दिली आहे. पीटरसन यांनी खेळाडू म्हणून आयपीएलचे एकूण पाच मोसम खेळले आहेत. त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचे प्रतिनिधित्व केले असून २०१४च्या मोसमात ते या संघाचे कर्णधारही होते. (Kavin Pietersen)

दरम्यान, आयपीएलच्या २०२५च्या मोसमास महिन्याभराहूनही कमी कालावधी शिल्लक असला, तरी अद्याप दिल्ली संघाकडून कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मागील वर्षी संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या रिषभ पंतला यंदाच्या लिलावात दिल्लीने मुक्त केले होते. त्यानंतर, लखनौ सुपरजायंट्स संघाने त्याला करारबद्ध केले असून यंदाच्या मोसमात तो लखनौचे नेतृत्व करेल. (Kavin Pietersen)

हेही वाचा :

चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानची बाजी

भारतीय महिलांचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00