Home » Blog » Journalist awards: अनंत दीक्षित, मोहन मस्कर स्मृती पुरस्कारांचे शनिवारी वितरण

Journalist awards: अनंत दीक्षित, मोहन मस्कर स्मृती पुरस्कारांचे शनिवारी वितरण

कुमार केतकर, आलोक निरंतर पुरस्काराचे मानकरी

0 comments
Journalist awards

कोल्हापूर :  प्रतिनिधी : ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित व मोहन मस्कर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी, १० मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच  वाजता होणार आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. (Journalist awards)

अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांना तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार भारतातील ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संपादक अनंत दीक्षित आणि तरुण पिढीतील हरहुन्नरी पत्रकार मोहन मस्कर यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अनंत दीक्षित स्मृती समितीकडून करण्यात आले आहे. (Journalist awards)

You may also like

error: Content is protected !!