मेलबर्न : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी स्पर्धेच्या चौथ्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड हा बुमराहचा कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी ठरला. हा टप्पा गाठताना बुमराहने काही विक्रमही आपल्या नावावर केले. (Jaspreet bumrah)
३९१२ – बुमराहने कसोटीमध्ये ३,९१२ धावा देत २०० विकेट घेतल्या. आतापर्यंत कसोटीत २०० विकेट घेणाऱ्या ८५ गोलंदाजांमध्ये बुमराहने सर्वांत कमी धावा दिल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज जोएल गार्नर यांचा विक्रम मोडला. गार्नर यांनी ४,०६७ धावांमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या होत्या. (Jaspreet bumrah)
१९.५६ – बुमराहने १९.५६ च्या सरासरीने २०० कसोटी विकेट घेतल्या असून सर्वांत कमी सरासरीचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला. दुसऱ्या स्थानावरील गार्नर यांची सरासरी २०.३४ इतकी असून २०.३९ च्या सरासरीसह दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक तिसऱ्या स्थानी आहे.
२३ – मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बुमराहने आतापर्यंत २३ विकेट घेतल्या आहेत. भारताबाहेरच्या एकाच मैदानावर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहने अग्रस्थान पटकावले. त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर २० विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळे यांना मागे टाकले.(Jaspreet bumrah)
४४ – बुमराहने ४४ व्या कसोटीत २०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. भारतातर्फे सर्वांत कमी सामन्यांत २०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो रवींद्र जडेजासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. भारतातर्फे सर्वांत वेगवान २०० विकेट रविचंद्रन अश्विनने ३७ कसोटींत घेतल्या आहेत. बुमराह हा भारताचा सर्वांत कमी सामन्यांत २०० विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. (Jaspreet bumrah)
हेही वाचा :