मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाने ‘ग्रुप ए’मध्ये गतविजेत्या मुंबईवर ५ विकेटनी मात केली. मुंबईने विजयासाठी ठेवलेले २०५ धावांचे आव्हान जम्मू आणि काश्मीरने तिसऱ्या दिवशीच ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह जम्मू आणि काश्मीरने ‘ग्रुप ए’मध्ये २९ गुणांसह अग्रस्थान पटकावले. मुंबईचा संघ २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (Jammu & Kashmir)
शार्दुलचे शतक वाया
दुसऱ्या डावामध्ये ७ बाद १०१ अशा अडचणीत सापडलेल्या मुंबई संघास शार्दुल ठाकूरच्या शतकाने सावरले. त्याने तनुष कोटियनसह आठव्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी रचली. शार्दुलने १३५ चेंडूंमध्ये १८ चौकारांसह ११९ धावा केल्या. तनुषने ६ चौकारांसह ६२ धावा करून शार्दुलला उपयुक्त साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईने दुसऱ्या डावात २९० धावा करून जम्मू आणि काश्मीरसमोर विजयासाठी २०५ धावांचे आव्हान ठेवले. (Jammu & Kashmir)
दुसऱ्या डावात शम्स मुलाणी वगळता मुंबईच्या अन्य गोलंदाजांना जम्मू आणि काश्मीरच्या विकेट घेण्यात यश आले नाही. परिणामी, जम्मू आणि काश्मीरने ५ बाद २०७ धावा करून विजय साकारला. शम्सने ५४ धावांत ४ विकेट घेतल्या. दोन्ही डावांत मिळून ७ विकेट घेणारा जम्मू आणि काश्मीरचा युधवीर सिंह सामनावीर ठरला. (Jammu & Kashmir)
शुभमनच्या शतकानंतरही पंजाब पराभूत
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. तरीही पंजाब संघास ‘ग्रुप सी’मध्ये कर्नाटकविरुद्ध २०७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला. त्यानंतर कर्नाटकने ४७५ धावा करून ४२० धावांची मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावामध्येही शुभमनचा अपवाद वगळता पंजाबच्या अन्य फलंदाजांना दीर्घ खेळी करता आली नाही. त्यामुळे त्यांचा डाव २१३ धावांत आटोपला.
शुभमनने एकाकी लढत देत १७१ चेंडूंमध्ये १४ चौकार व ३ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली. या विजयासह कर्नाटकचा संघ ‘ग्रुप सी’मध्ये १९ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या गटात पंजाब ११ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. (Jammu & Kashmir)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव १२० आणि दुसरा डाव ७४ षटकांत सर्वबाद २९० (शार्दुल ठाकूर ११९, तनुष कोटियन ६२, रोहित शर्मा २८, अकिब नबी ४-८०, युधवीर सिंह ३-६४) पराभूत विरुद्ध जम्मू आणि काश्मीर – पहिला डाव २०६ आणि दुसरा डाव – ४९ षटकांत ५ बाद २०७ (शुभम खजुरिया ४५, विव्रांत शर्मा ३८, अबिद मुश्ताक नाबाद ३२, शम्स मुलाणी ४-५४, मोहित अवस्थी १-३३).
हेही वाचा :
मॅडिसन कीज् अजिंक्य