Home » Blog » IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

धोनी, जडेजा, बुमराह नव्या विक्रमांच्या उंबरठ्यावर

by प्रतिनिधी
0 comments
IPL 2025

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, तसेच मुंबईचा जसप्रीत बुमराह हे खेळाडू नवे विक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. (IPL 2025)

महेंद्रसिंह धोनी

१९ – महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जतर्फे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवण्यासाठी १९ धावांची आवश्यकता आहे. सध्या हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर असून त्याच्या ४,६८७ धावा आहेत.

८ – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी रवींद्र जडेजाला ८ विकेट हव्या आहेत. सध्या चेन्नईतर्फे ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक १४० विकेट घेतल्या आहेत. (IPL 2025)

४१ – रवींद्र जडेजाने या मोसमात ४१ धावा काढल्यास तो आयपीएलमध्ये ३,००० धावा आणि १०० विकेट पूर्ण करणारा पहिला अष्टपैलू ठरेल. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये २,९५९ धावा आणि १५६ विकेट जमा आहेत.

४ – विराट कोहलीने या मोसमात चारवेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडल्यास तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५०हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. हा विक्रम सध्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने ४ शतके व ६२ अर्धशतके अशा एकूण ६६ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटच्या नावावर ८ शतके आणि ५५ अर्धशतके आहेत. (IPL 2025)

रोहित new1.jpg

३ – या मोसमामध्ये रोहित शर्मा पहिला सामना खेळताच आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचेल. सध्या धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक २६४ सामने खेळले असून रोहित २५७ सामन्यांसह दिनेश कार्तिकसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ एक चौकार मारल्यास रोहित आयपीएलमध्ये ६०० चौकारांचा टप्पा ओलांडणारा चौथा खेळाडू ठरेल. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावण्यासाठी रोहितला १४२ धावांची आवश्यकता आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या (८,००४) नावावर असून शिखर धवन (६७६९) दुसऱ्या, तर रोहित (६,६२८) तिसऱ्या स्थानी आहे.

६ – आयपीएलमधील मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक विकेटचा विक्रम नोंदवण्यासाठी जसप्रीत बुमराहला ६ विकेटची गरज आहे. सध्या मुंबईतर्फे लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये सर्वाधिक १७० विकेट घेतल्या आहेत. (IPL 2025)

हेही वाचा :
ठाकूरांची उमेदवारी दाखल करून घ्या
 तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00