नवी दिल्ली : मोहमद इम्रान खान : गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाने रोगराईचा विळखा घट्टच होत आहे. केवळ पोटाचेच विकार वाढले आहेत असे नाही; कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांचेही प्रमाण धोकादायकरित्या वाढत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. बिहारसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. (ganga and cancer)
कॅन्सरला कारण असणारे मँगनीज (Mn) चे मोठ्या प्रमाणात गंगेच्या पाण्यात आढळले आहे. तेच रुग्णांचे प्रमाण वाढीला कारणीभूत ठरत असल्याचा दावा पाटणास्थित महावीर कॅन्सर संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने केला आहे.(ganga and cancer)
मँगनीजचे वाढते प्रमाण हा विषाक्ततेचा नवीन घटक आहे. त्यामुळे कर्करोग होतो. ‘डाउन टू अर्थ’च्या अभ्यास पथकातील प्रमुख शास्त्रज्ञ अरुण कुमार यांनी सांगितले की, पाण्यात मँगनीजचे प्रमाण जास्त असणे हे कर्करोगाला निमंत्रण आहे. ते धोक्याचे आहे.
“अभ्यासासासाठी घेतलेल्या कर्करोग रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यात ६,०२२ मायक्रोग्राम प्रति लिटर एवढे मँगनीजची सर्वोच्च पातळी आढळली. ती सर्वाधिक आणि घातक आहे. कॅन्सर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील हातपंपाच्या पाण्याच्या नमुन्यांतही मँगनीजचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळले. या रूग्णांच्या रक्तातील ‘एमएन’ दूषितता आणि हातपंपाचे पाणी यांतील महत्त्वपूर्ण संबंध अभ्यासात आढळून आले आहेत,” असे अरुण कुमार यांनी सांगितले.(ganga and cancer)
ते म्हणाले की, बिहारमध्ये गेल्या काही दशकांत कर्करोगाच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. कर्करोग होण्यामागे एकापेक्षा जास्त घटक कारणीभूत असू शकतात. परंतु त्यात मँगनीज हा महत्त्वपूर्ण भूमिका असलेला घटक आहे. ज्यामुळे विषारीकरण वाढते आणि कर्करोग होतो.
पाणी आणि कर्करुग्णांचे वाढते प्रमाण याविषयी झालेल्या संशोधनासाठी पाटणा, वैशाली, पूर्व चंपारण, मुझफ्फरपूर, सिवान आणि सारण या जिल्ह्यांतून १,१४६ कर्करुणांचे रक्त नमुने घेण्यात आले. २ ते ९२ वर्ष वयोगटातील हे रुग्ण आहेत. त्यांपैकी सुमारे ७६७ स्त्रिया (६७ टक्के) आणि ३७९ पुरुष (३३ टक्के) होते.(ganga and cancer)
या रुग्णांपैकी, ३८१ जणांना स्तनाचा कर्करोग, हेपॅटोबिलरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग असलेले ३०९, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेले ६४ आणि मुख, नाक आणि मूत्रमार्गाचा कॅन्सर झालेल्या इतर रुग्णांचे प्रमाण ३९८ होते.
कुमार म्हणाले की, मुख्यतः कर्करोगाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर असलेल्या रुग्णांच्या रक्तात लक्षणीय मँगेनीजचे प्रमाण आढळले. ते जागतिक आरोग्य संघटना वा औद्योगिक मानक ब्युरोने घालून दिलेल्या मर्यादेच्या कितीतरी पट जास्त आहे.
अभ्यास पथकाचे सदस्य आणि महावीर कॅन्सर संस्थेच्या संशोधन केंद्राचे प्रमुख अशोक कुमार घोष यांनी, हातपंपाचे पाणी आणि कर्करोग यासंबंधी भारतात पहिल्यांदाच हे नवीन संशोधन पुढे आले आहे. प्रभावीत भागात नियमीतपणे सुरू असलेल्या या पाण्याचा वापर कदाचित कर्करुग्ण वाढीचे एक कारण असू शकेल.
कुमार म्हणाले की, ग्रामीण भागात पाण्यातील वाढत्या मँगनीजचा धोका जास्त आहे. त्यासंबंधीचे अज्ञान, जागरूकततेचा आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे निदान केले जात नाही. किंवा उशीराने निदान केले जाते. त्यामुळे कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला गेला की मगच रुग्णांना त्याचे गांभीर्य कळते. तोपर्यंत उशीर झालेला असतो.
बिहारसाठी धोक्याची घंटा
कर्करोगाच्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांत आढळलेल्या मँगनीजच्या विश्लेषणात विशेषत: मध्य बिहारमधील गंगेच्या मैदानी प्रदेशात लक्षणीय प्रमाण आहे. जिओ-मॅपिंगने हातपंपाच्या पाण्याचा घरगुती वापर आणि कर्करोगाच्या रूग्णांच्या रक्तातील मँगनीजचे प्रमाण यांतील महत्त्वपूर्ण संबंध तपासले. त्यात वाढते मँगनीज आणि कर्करोग यांचा संबंध स्पष्ट झाला आहे. बिहारसाठी ही धोक्याची घंटा आहे.
हेही वाचा: