पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत बंपर यश संपादन केल्यानंतर नीतिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची दहाव्यांदा शपथ घेतली. दहाव्यांदा शपथ घेणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. नीतीश कुमार यांच्यासमवेत सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि १९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
महात्मा गांधी स्टेडियमवर विराट जनसमुदायाला साक्षी ठेवत नीतीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल अरिफ महमंद खान यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या निवडणुकीत जाणकारांचे सर्व आडाखे चुकवत एनडीएने तब्बल दोनशेवर जागा जिंकल्या. विरोधी राजप, काँग्रेस, डावे यांच्या महागठबंधनचा सुपडासाफ झाला. नीतीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड तब्बल ८५ जागा जिंकून जोरदार कमबॅक केले. मागील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अवघ्या २९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी जदयु आणि भाजपने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष असून नीतीशकुमार यांचे बिहारमधील वलय आणि जयदुला मिळालेल्या जागा लक्षात घेऊन त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. (Nitish Kumar takes oath as 10th CM)
दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नीतीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या एनडीएमधील नेते उपस्थित होते. (Nitish Kumar takes oath as 10th CM)
शपथविधीबद्दल केंद्रीय मंत्री जितन राम मांझी म्हणाले. बिहारसाठी हा एक ऐतेहासिक क्षण आहे. आतापर्यंत कोणीही १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली नाही. बिहारच्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधान शपथविधीसाठी आले आहेत. (Nitish Kumar takes oath as 10th CM)