Home » Blog » इचलकरंजी : डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार

इचलकरंजी : डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार

यशोदा पूलाजवळ अपघात

by प्रतिनिधी
0 comments
Ichalkaranji Accident

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले. देवदर्शनावरून परतत असताना डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या. तर पती संजय वडिंगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रमुख होते. ते १५ दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते.

ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला.अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेवून एकच आक्रोश केला. अपघातामुळे पूलाजवळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. मृत संजय वडिंगे यांचा मुलगा तुरुंग पोलिस दलात कार्यरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असून संबंधित डंपरचालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00