Home » Blog » घरफोडीसाठी गेला नि टुल्ल होऊन पडला…!

घरफोडीसाठी गेला नि टुल्ल होऊन पडला…!

चोरीनंतर दारू पिण्याचा मोह नडला…

by प्रतिनिधी
0 comments
Hyderabad News

हैदराबाद : घरफोडीसाठी तो वाईन शॉपमध्ये गेला. त्यांनी काही बाटल्या आणि दुकानातील रोकड पिशवीत कोंबली. बाहेर पडण्याआधी तिथेच दोन घोट घ्यायची इच्छा झाली. पण, मोह आवरला नाही. तो पित राहिला आणि टुल्ल होऊन दुकानातच पडला. सकाळी मालकाने दुकान उघडले तेव्हा हे दृश्य पाहून मालकही आश्चर्यचकीत झाला. (Hyderabad News)

मेडक जिल्ह्यातील नरसिंगी येथे ही घटना घडली. वाइन शॉपमालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन चोरट्याला ताब्यात घेतले.

रविवारी रात्री या चोरट्याने दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश केल्याचे उघड झाले. कनकदुर्गा वाईन शॉपमध्ये ही घटना घडली. चोरट्याने दुकानात प्रवेश केला. काही रोकड सोबत आणलेल्या पिशवीत कोंबली. दारूच्या बाटल्याही भरल्या. दुकानात बसून भरपूर दारुही प्यायली. मद्यधुंद अवस्थेत तो अक्षरश: बेशुद्धावस्थेत तिथेच आडवा झाला. सकाळी दुकान उघडले तेव्हा दुकानमालकाला आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. शुद्धीत आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (Hyderabad News)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00