Home » Blog » Holkar Nagar : नाल्यातून सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू

Holkar Nagar : नाल्यातून सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Holkar Nagar

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात नाल्यात पडल्याने दोघे सख्खे भाऊ वाहून गेले. या दुर्दर्वी घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर सख्ख्या भावाला वाचविण्यात यश मिळाले. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे ही घटना घडली. खासगी क्लासमधून घरी खेळत खेळत येत असताना दोघे नाल्यात पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठे प्रयत्न केले. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.

केदार मारुती कांबळे (वय ११) असे मयत मुलाचे नाव असून त्याचा लहान भाऊ जेम्स मारुती कांबळे (वय ८, दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. (Holkar Nagar)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार फुलेवाडी रिंगरोड परिसरातील दत्त कॉलनी येथील मारुती कांबळे गवंडी काम करतात. शनिवारी ते सकाळी कामावर गेले होते. तर पत्नी लहान मुलाला घेऊन देवदर्शनासाठी गेली होती. केदार आणि जेम्स हे दोघे खासगी क्लासला गेले होते. (Holkar Nagar)

क्लास सुटल्यानंतर दोघे भाऊ घरी निघाले. अहिल्याबाई होळकर नगर येथील शिवतेज तरुण मंडळाजवळ खेळता खेळता दोघे रस्त्याकडेच्या नाल्यात पडले. सकाळपासून संततधार पावसामुळे नाला तुडुंब भरुन वाहत होते. दोघेही पाण्याच्या प्रवाहाने ३० ते ३५ फूट वाहून गेले. ते वाहून जात असताना दोघांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक नाल्याकडे धावले. दोघांना वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला. पण पाण्याची खोली आणि प्रवाह जास्त असल्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यास अडचण येत होती. काही तरुणाईनी सिमेंटचे पत्रे घालून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत होती. तातडीने त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. उपचारादरम्यान केदारचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर लहान भाऊ जेम्सच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. या घटनेने कांबळे कुटुबियांनी सीपीआर अपघात विभागाबाहेर हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Holkar Nagar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00