Home » Blog » हेळवी होणार हायटेक

हेळवी होणार हायटेक

वंशावळीच्या नोंदी ठेवणार लॅपटॉपवर

by प्रतिनिधी
0 comments
Helvi Community

कोल्हापूर; प्रतिनिधी : पणजा, खापरपणजोबासह शेकडो वर्षाच्या वंशावळी आणि कुळाच्या नोंदी ठेवणार हेळवी आता हायटेक होणार आहे. पूर्वीच्या कागदी वह्या, चोपड्याबरोबर आता त्यांना लॅपटॉवर नोंदी ठेवता येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील  वाशीतील (ता. करवीर) धार पवार समाजाच्यावतीने हेळव्यांना लॅपटॉप प्रदान करण्यात आले. (Helvi Community)

राजे महाराजे, सरकार इनामदारांसह बलुतेदार अलुतेदारातील सर्व समाजातील पूर्वजांच्या नोंदी हेळवी समाजाने अत्यंत निष्ठेने आणि काळजीपूर्वक ठेवल्या आहेत. त्या समाजातील काही निवडक हेळव्यांना धार पवार समाजाच्यावतीने लॅपटॉप प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे.के.पवार होते. सर्व समाजातील पूर्वजांच्या नोंदी हेळवी समाजाने अत्यंत निष्ठेने आजवर ठेवल्या आहेत. आता २१ व्या शतकात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नोंदी ठेवण्यासाठी त्यांना लॅपटॉप देण्याचे आदर्शवत कार्य वाशी गावातील लोकांनी केले आहे. लॅपटॉप मुळे इतिहासातील नोंदी डिजिटल होतील असे मत प्रा.डॉ. जे. के. पवार यांनी व्यक्त केले.

हेळवी समाजाने वंशपरंपरा, चाली, रितीरिवाज, समाजाचे स्थलांतर व शौर्य गाथा यांमधून संस्कृती वाहकाचे काम केले. या सर्व नोंदी ग्रामपंचायतकडे नसतात पण हेळव्यांच्या दप्तरी निश्चितपणे असतात. हे दप्तर जीर्ण, कालबाह्य होत आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी हेळव्यांच्या मुलांना व्यवसाय व शिक्षणाबरोबर या नोंदी ठेवण्यासाठी लॅपटॉप भेट देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम वाशी येथे राबविण्यात आला असल्याचे भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. बी. ए. पाटील यांनी मनोगतातून सांगितले. (Helvi Community)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मानले. यावेळी बापूसो पाटील, संभाजी पाटील, एम बी पाटील, एम एस पाटील, शंकर पाटील, युवराज पाटील, सचिन पाटील, विलास पाटील, नारायण पाटील, किरण पाटील, रघुनाथ पाटील, प्रभाकर पाटील, अर्जुन पाटील, बजरंग हेळवी, विठ्ठल हेळवी व समाज बांधव उपस्थित होते.

मोडी लिपी भाषेचे लिखाण लोप पावत आहे.जुने मराठी लिपीतील दप्तर जीर्ण झाले आहे. त्यामुळे चालू पिढीच्या नोंदी ठेवण्याची मोठी अडचण भेडसावत होती. पण वाशी येथील पाटील समाजाने वंशपरंपरागत नोंदी ठेवण्यासाठी लॅपटॉप भेट दिला आहे. आमची मुले शिकली असल्याने आता मागील व भविष्यातील नोंदी ठेवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मच्छिंद्र शिवराम हेळवी,  बेक्केरी, कर्नाटक

 

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00