Home » Blog » Harry Brook : ब्रुक इंग्लंडचा नवा कर्णधार

Harry Brook : ब्रुक इंग्लंडचा नवा कर्णधार

टी-२० व वन-डे संघांचे करणार नेतृत्व

by प्रतिनिधी
0 comments
Harry Brook

लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रुकची देशाच्या टी-२० आणि वन-डे क्रिकेट संघांचा नवा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मागील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलरने मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. (Harry Brook)

मागील वर्षभरापासून ब्रुकवर टी-२० व वन-डे संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बटलरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत ब्रुकने कर्णधार म्हणूनही काम पाहिले होते. आता पुढील महिन्यात इंग्लंड-वेस्ट इंडिजदरम्यान तीन टी-२० आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका ही पूर्णवेळ कर्णधार म्हणून बुकची पहिली मालिका असेल. ब्रुकच्या नावावर २६ वन-डे सामन्यांत ८१६ धावा, तर ४४ टी-२० सामन्यांत ७९८ धावा जमा आहेत. (Harry Brook)

“मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार होणे ही सन्मानाची बाब आहे. मी लहानपणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी यॉर्कशायर, इंग्लंड संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. आता मला इंग्लंड संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे,” असे ब्रुक म्हणाला. २०२२ मध्ये कसोटी व टी-२०, तसेच २०२३ मध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रुकने आतापर्यंत तिन्ही प्रकारांत छाप पाडली आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तो सध्या इंग्लंडच्या जो रूटखालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी पाकिस्तानविरुद्ध त्याने मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावताना ३१७ धावांची खेळी केली होती. (Harry Brook)

ब्रुकने यापूर्वी, २०१८ च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्येही इंग्लंडचे नेतृत्व केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतात टी-२० वर्ल्ड कप रंगणार असून या स्पर्धेत कामगिरी उंचावणे हे ब्रुकसमोरचे मोठे लक्ष्य असेल. २०२२ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडला आयसीसी स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. २०२३ चा वन-डे वर्ल्ड कप व २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले होते. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला भारताकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा :
रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण
बुमराह मुंबई संघात परतला

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00