मुंबई : महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क | रिव्हॉल्व्हरमधून चुकून उडालेल्या गोळीमुळे अभिनेता गोविंदा (Govinda Bullet Injury) जखमी झाले. आज (दि.१) पहाटे त्यांच्या घरातच ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गोविंदांनी स्वत: एक ऑडिओ संदेश प्रसारीत करून आपली प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे. तसेच चाहते, आईवडील आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे मी या दुर्घटनेतून बचावलो. माझ्याप्रति सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे म्हटले आहे.
अशी घडली घटना..
आज (दि.१) पहाटे पावणे पाचच्या सुमारास गोविंदा विमानाने कोलकत्त्याला जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडील परवानाप्राप्त रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ते खाली पडले. त्यातून गोळी उडाली आणि ती गुडघ्याखाली लागली. गोविंदांनी तातडीने ही माहिती कोलकत्त्यात असलेली त्यांची पत्नी आणि सेक्रेटरीला कळवली. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. जुहू येथील निवासस्थानापासून जवळच असलेल्या क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी गोविंदा यांना किमान दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात त्यांच्यासोबत मुलगी टीना उपस्थित आहे. (Govinda Bullet Injury)
मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
गोविंदा हे सिनेमाच्या झगमगत्या दुनियेमधील लोकप्रिय व यशस्वी कारकिर्दीबरोबरच राजकारणातील त्यांच्या प्रवेशामुळेही विशेष चर्चेत असतात. त्यांनी खासदारपदही भूषविले आहे. सुरूवातीला काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत ते सक्रीय राहिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वेतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
— ANI (@ANI) October 1, 2024
हेही वाचा :
- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
- अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…
- राहुल गांधी ४, ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर