नवी दिल्ली : प्रतिनिधी : तेवीस बालकांच्या मृत्यूप्रकरणी कोल्ड्रिक कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन (७३ ) याला अटक केली आहे. मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने तामिळनाडूची राजधानी चैन्नई येथे छापे टाकून त्याला बेड्या ठोकल्या. (Govind Ranganathan)
मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे आजअखेर २३ मुलांचा मृत्यू झाला आहे. हे कफ सिरप घेतल्याने लहान मुलांच्या किडनी आणि मेंदूवर परिणाम होत असून त्यामुळे मुले दगावली अहेत. केंद्र आणि राज्य सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घातली आहे. कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले. त्यांनी कंपनीचा संचालक गोविंदन रंगनाथन याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर रंगनाथन चेन्नईतील राहते घर आणि कांचीपूरम येथील फॅक्टरीला टाळ लावून पत्नीसोबत फरार झाला होता. पोलिसांनी रंगनाथनवर वीस हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. (Govind Ranganathan)
मध्यप्रदेशातील छिंदवाडातील परिसिया पोलिस ठाण्यात पाच ऑक्टोबरला श्रीसन फार्माचे संचालक मंडळ, औषध निर्माता, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रविण सोनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केले आहे. डॉ. सोनी यांना यापूर्वीच अटक केली आहे. . कोल्ड्रिफ सिरपची तपासणी केली असता ड्रग कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालामध्ये हे सिरज नॉन फॉर्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्याचे उघड झाले. त्यामुळे लहान मुलांना त्याचा त्रास झाला आणि २३ मुलांना जीव गमवावा लागला. काही मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशातील कफ सिरप प्याल्याने गंभीर अवस्थेतील काही मुलांवर नागपूर येथेही उपचार सुरू आहेत. (Govind Ranganathan)