महाराष्ट्र दिनमान डेस्क : राग, लोभ, मत्सर यांवर विजय मिळवणाऱ्याला साधू, संत म्हटले जाते. साधूसंत सोने नाणे, संपत्तीकडे ढुंकूनही पहात नाहीत. त्यांना आसक्ती नसते, पण महाकुंभमेळ्यातील एक साधू त्यांच्या अंगावर असलेले दागिने आणि किमती हिऱ्यांमुळे चर्चेत आहेत. ‘गोल्डनबाबा’ नावाने ते परिचित आहेत.(Golden Baba)
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या अंगावर चार किलो सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्याकडे हिरेजडीत घडाळे आहेत. दागिने आणि घड्याळ्यांची बाजारभावानुसार सहा कोटी रुपये किंमत आहे. महाकुंभ नगरात गोल्डन बाबा एस.के. नारायण हे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. दुसरे महामंडलेश्वर अरुण गिरी यांच्याकडेही सहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आहेत.
गोल्डन बाबा निरंजनी आखाड्याचे आहेत. ते चार किलो सोन्याचे दागिने घालतात. या दागिन्यांची किंमत सहा कोटी रुपये आहे. त्यांना निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर बनवले आहे. महंताकडे देवदेवतांची नक्षी असलेली सोन्याची किमती छडी आहे. गुरूबद्दल भक्ती प्रतित करण्यासाठी आपण दागिने घालतो असे त्यांचे म्हणणे आहे. मूळचे केरळचे आणि सध्या दिल्लीत वास्तव्य असलेल्या गोल्डन बाबांच्या मोबाईलचे कव्हरही सोन्याचे आहे.(Golden Baba)
‘पर्यावरण बाबा’नाही सोन्याची हौस
संत अरुण गिरी हे पर्यावरण बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. तेही सोन्याचे दागिने घालतात. अरुण गिरी यांनी एक हजार पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. महाकुंभ मेळ्यात ते आपल्या भक्तांना फळांच्या ५१ हजार रोपांचे वाटप करणार आहेत. रत्नजडीत अंगठ्या, सोन्याचे कडे आणि हिऱ्याची घड्याळे घातल्यावर शरीरात उर्जेचा संचार होतो. त्यामुळे ध्यान करताना दागिन्यांचा फायदा होतो, असे ते सांगतात. (Golden Baba)
बडोदावाले बाबा
श्री दशनाम श्री संत गुरुदत्त आखाड्याचे संत अदित्यनाथ गिरी २३ जानेवारीला महाकुंभमेळ्यात पोहोचणार आहे. बडोदा येथील हे संत पाच किलो सोन्याचे दागिने घालतात. दागिने घातल्यावर सूर्यदेवाची ऊर्जा बाहेर पडते असे त्याचे म्हणणे आहे.(Golden Baba)