Home » Blog » Glenn Philips : ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर

Glenn Philips : ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर

रबाडापाठोपाठ गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का

by प्रतिनिधी
0 comments
Glenn Philips

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमामध्ये खेळाडूंच्या अनुपलब्धतेने गुजरात टायटन्स संघाचा पिच्छा पुरवला आहे. आता गुजरातकडून खेळणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतग्रस्त झाला असून तो उर्वरित आयपीएल मोसमात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. (Glenn Philips)

गुजरात आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान ६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये फिलिप्सच्या मांडीचा सांधा दुखावला होता. हा त्याचा यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच सामना होता. या सामन्यात प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर इशान किशन व नितीशकुमार रेड्डी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी चेंडू अडवताना फिलिप्स दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी पुढील चेंडूअगोदरच त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. आता या दुखापतीमुळे तो संपूर्ण मोसमात खेळू शकणार नसल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. गुजराततर्फे अद्याप फिलिप्सच्या बदली खेळाडूची घोषणा बाकी आहे. (Glenn Philips)

फिलिप्सअगोदर गुजराततर्फे खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेऊन ३ एप्रिलला मायदेशी परतला होता. गुजरातने या मोसमासाठी केवळ सात परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते. त्यांपैकी संघामध्ये आता जोस बटलर, रशीद खान, शेर्फेन रुदरफोर्ड, करीम जनात आणि गेराल्ड कोएत्झी हे परदेशी खेळाडू उरले आहेत. गुजरात संघाने मोसमात आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले असून गुणतक्त्यात गुजरातचा संघ ८ गुणांसह अग्रस्थानी आहे. (Glenn Philips)

हेही वाचा :
केएल राहुलचे ‘कांतारा’ स्टाईल सेलिब्रेशन

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00