Home » Blog » German patent : नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्मिती

German patent : नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्मिती

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना जर्मन सरकारचे पेटंट

by प्रतिनिधी
0 comments
German patent

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. (German patent)

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक तथा रसायनशास्त्रज्ञ डॉ. सागर डेळेकर यांच्यासह डॉ. क्रांतिवीर मोरे,  डॉ. तुकाराम डोंगळे, भारती विद्यापीठाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम, डॉ. प्रमोद कोयले, डॉ. अनंत दोडामणी (एस.जी.एम. कॉलेज, कराड), डॉ. दीपक कुंभार (ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी) यांनी या संशोधन प्रक्रियेत सहभाग घेतला. (German patent)

हे संशोधन सौरऊर्जा निर्मिती क्षेत्राला गती देणारे ठरेल, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला. तयार केलेली वेगवेगळी नॅनोसंमिश्रे आणि त्यापासून तयार करावयाचे उपकरण कमीत कमी तापमानात आणि अत्यल्प वेळेमध्ये बनवता येते,  तसेच ते सुलभतेने हाताळता येते. हे उपकरण सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

सौरऊर्जेचे उत्पादन त्या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबून असते. तसेच ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतही महत्त्वाची ठरते. विद्यापीठातील संशोधकांनी वेगवेगळ्या नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी पद्धत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार केली आहे. यामध्ये कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईडच्या नॅनोमूलद्रव्यांचा वापर केला आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे सौर ऊर्जा क्षेत्राला नवीन चालना मिळेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. (German patent)

या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे सर यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

 परराज्यातील नागरिकांना मातृभाषेतून शिकण्याचा हक्क
गिधाड संरक्षणासाठी वन विभाग सरसावला
आजोबावर केले सत्तर वार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00