Home » Blog » शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

by प्रतिनिधी
0 comments
Farmer Protest file photo

चंदीगडः आपल्या मागण्यांसाठी हरियाणा-पंजाबच्या शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्यास परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्याची घोषणा केली आहे. ६ डिसेंबर रोजी शेतकरी वेगवेगळ्या गटात पायी दिल्लीला रवाना होतील आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर ते आपले आंदोलन पुढे नेतील.

किसान आंदोलन २.० सुरू होऊन ९ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. अशा परिस्थितीत पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी बसून आंदोलन करत आहेत. यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक शेतकरी १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. यानंतर आता ‘केएमएम’चे नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले  की, दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. सहा डिसेंबरला दिल्लीकडे रवाना होऊ. शेतकरी दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवास करणार आहेत. हरियाणा सरकारही शेतकऱ्यांना मदत करेल, अशी अपेक्षा पंढेर यांनी व्यक्त केली.

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा सरकारकडून पिकांसाठी किमान आधारभावाची कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत. शेतकरी नेते म्हणाले की, गेल्या ९ महिन्यांपासून आम्ही शांतपणे बसलो आहोत आणि सरकारशी बोलण्याची वाट पाहत आहोत. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही, त्यानंतर आमच्याकडे पर्याय उरला नाही; पण आता आम्ही दिल्लीला जाणार आहोत.

‘२८० दिवसांपासून दोन्ही सीमांवर शेतकरी तळ ठोकून आहेत आणि १८ फेब्रुवारीपासून केंद्राने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली होती. सरकारी संस्था कडधान्य, मका आणि कापूस पिकांची पाच वर्षांसाठी एमएसपीवर खरेदी करतील, असा प्रस्ताव सरकारने ठेवला होता; परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता.

– तेजवीर सिंग, नेते, भारतीय किसान युनियन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00