शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली असून आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते. (Farmers oppose Shaktipeth)
आमदार जयंत पाटील म्हणाले की, या प्रस्तावित महामार्गामुळे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचे समाधान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी बळजबरी करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेऊ नये, असा इशारा दिला. गंभीर प्रश्नांपेक्षा इतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी प्रसार माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहेत. त्यामुळे लोकं त्यातच अडकतात आणि आपल्या अंगावरून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे याचा विसर त्यांना पडतो असे होता कामा नये . शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. (Farmers oppose Shaktipeth)

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील सभेत शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार हा महामार्ग करणार नसल्याचा आश्वासन दिलेला व्हिडीओ यावेळी दाखवला. यापूर्वीच राज्यातील देवस्थानांना जोडण्यासाठी चांगले रस्ते असताना शक्तीपीठ महामार्गाची काय आवश्यकता?असा प्रश्न विचारत राज्य सरकार कंत्राटदाराच्या फायद्यांसाठी हा शक्तिपीठ महामार्ग करत असून शेतकरी हिताशी शासनाला काही देणे घेणे नाही, अशी टीका दानवे यांनी केली. (Farmers oppose Shaktipeth) विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील म्हणाले,’ विधानसभा निवडणूकीनंतर आता महायुती सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग करत असेल तर त्याला ठामपणे विरोध केला जाईल. यावेळी आमदार कैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, माजी खासदार राजू शेट्टी व दिलीप सोपल आदींनी भूमिका मांडल्या.
हेही वाचा :
मानवी तस्करीचा प्रयत्न; ‘प्राध्यापका’ला अटक