गोरखपूर : विवाहविधीत सप्तपदीसाठी भटजींनी वर आणि वधूला तयार राहण्यास सांगितले. त्याचवेळी वधूने मला टॉयलेटला जायचे असे सांगितले. ती टॉयलेट गेली पण बराच वेळ आली नाही. नातेवाईक तिला बोलावण्यास गेले असता दागदागिने, पैसे आणि उंची वस्त्रासह वधूने पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील खजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरोहिया शिव मंदिरातील लग्न सोहळ्यावेळी घडली. (fake bribe)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतापूर जिल्ह्यातील गोविंदपूर गावातील कमलेश कुमार (वय ४०) यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. एक मध्यस्थामार्फत विवाह निश्चित करण्यात आला. विवाहाची व्यवस्था करण्यासाठी तीन हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते.(fake bribe)
तीन जानेवारीला विवाह समारंभासाठी कमलेश आपल्या नातलगांसह गोरखपूरला पोचले. नियोजित वधू आपल्या आईसह विवाहस्थळी पोचली. त्या ठिकाणी कमलेश यांनी विवाहासाठी खर्चाची रक्कम, विवाहातील उंची साड्या, सौदर्य साधने, सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले. विवाहाचा विधी सुरू झाल्यानंतर नियोजित वधून टॉयलेटला जाणार असल्याचे सांगून ती निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती व तिची आई मिळून आली नाही. जाताना त्या वधू आणि तिच्या आईने रोख रक्कम, सोन्याचे दागिने, साड्या घेऊन विवाहस्थळावरुन पोबारा केला.(fake bribe)
या घटनेवर कमलेश म्हणाला, ‘नियोजित वधू तिच्या आईसह बेपत्ता झाल्यावर बराच वेळ स्तब्ध होतो. त्यांना दिलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही घेऊन गेल्या. मला माझा संसार पुन्हा उभा करायचा होता. मात्र आता मी सर्वकाही गमावून बसलो आहे.’
घटनेनंतर कमलेश यांनी अद्याप पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली नाही. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार म्हणाले, ‘खजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाही. पण तक्रार आल्यावर आम्ही या घटनेचा तपास निश्चित करु’.