Home » Blog » Eknath shinde speech: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा

Eknath shinde speech: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा

कोल्हापूरच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Eknath shinde speech

कोल्हापूर : प्रतिनिधी : भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकदिलाने काम करूया. या निवडणुका आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत, असा संकल्प बोलून दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले.(Eknath shinde speech)

राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या पुढाकारातून शनिवारी (५ एप्रिल) सरवडे, ता. राधानगरी येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, माजी आमदार जयश्री जाधव, डॉ. सुजीत मिणचेकर आदी उपस्थित होते. (Eknath shinde speech)

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवायचे काम आमच्या शिवसेनेने केल्याचा पुनरूच्चार शिंदे यांनी केला. राज्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही मुद्दामहून ही खाती मागून घेतली. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी दिले. त्यातून हजारो लोकांचे प्राण वाचले. सर्वसामान्य जनतेशी संबंधित जेवढी खाती आहे त्या माध्यमातून जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचे आमचे धोरण आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Eknath shinde speech)

आम्ही लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली. महायुती सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या विचारपूर्वक आणल्या आहेत. त्या कधीही बंद होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी दिला.

तुम्ही ‘मविआ’चा टांगा पलटी केला…

शिंदे म्हणाले, महायुतीला महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या जागा महायुतीला मिळाल्या. त्यामध्ये कोल्हापूरकर आघाडीवर होते. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी सांगून टाकले, शंभर टक्के निकाल दिला. दहा पैकी दहा जागा निवडून दिल्या. त्यामध्ये तुम्ही शिवसेनेचे पाच शिलेदार निवडून दिले. कोल्हापूर सोपे नसते. येथे सर्वच विषय हार्ड असतात. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, अशी कोल्हापूरकरांची भूमिका असते. तुम्ही महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला. त्यांचे घोडे फरार करून पाठविले. कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर आहे. नाद केला तर धोबीपछाड ठरलेले आहे. तुम्ही आबिटकर यांना आमदार केले, मी त्यांना नामदार करून आरोग्यमंत्री, पालकमंत्री केले असे सांगून शिंदे यांनी कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांचे कौतुक केले.
हेही वाचा :
समान नागरी कायद्याची गरज
वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00