Home » Blog » ED raid on TN minister: तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे

ED raid on TN minister: तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे

बँक कर्ज घोटाळ्यात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
ED raid TN minister

चेन्नई : बँक कर्ज घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रींग केल्याप्रकरणी तामिळनाडूचे कॅबिनेट मंत्री कनकिल्लियानल्लूर नारायणसामी नेहरू आणि त्यांचे खासदार पुत्र अरुण नेहरू यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (७ एप्रिल) छापे टाकले.(ED raid on TN minister)

नेहरू स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) सरकारमध्ये नगरपालिका प्रशासन, शहरी आणि पाणीपुरवठा मंत्री आहेत, तर त्यांचा मुलगा अरुण पेराम्बलूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

नेहरू कुटुंब चालवणाऱ्या कंपनीने बँक कर्जे वळवल्याच्या प्रकरणावर आधारित तक्रार माहिती अहवाल (ECIR) दाखल केल्यानंतर हे छापा आणि शोधसत्र अवलंबण्यायत आले, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने डिसेंबर २०२१ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. (ED raid on TN minister)

सीबीआयने चेन्नईस्थित कंपनी ट्रूडॉम ईपीसी इंडिया आणि तिच्या संचालकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या तक्रारीवर आधारित एफआयआर दाखल करण्यात आला होता. ट्रूडॉमने ३० जून २०२१ पर्यंत ३० कोटी रुपयांची कर्ज रक्कम त्यांच्या सहकाऱ्यांना वळवून किमान २२.४८ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे, असा आरोप बँकेने केला आहे. (ED raid on TN minister)

ट्रूडॉमला मार्च २०१३ मध्ये तिरुप्पूर जिल्ह्यात १००.८० मेगावॅटचा पवन ऊर्जा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांचे मुदत कर्ज देण्यात आले होते. त्रिशे रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्सबरोबर तसे दोन करार करण्यात आले होते.

या फर्मने पुढे हे निधी इकोडॉम पॉवर, मार्क ग्रीन डेव्हलपर्स आणि बालाजी ट्रेडर्सकडे वळवला. ही रक्कम अनुक्रमे १३.५० कोटी, १२.५० कोटी आणि ४ कोटी रुपये इतकी आहे. (ED raid on TN minister)

ट्रूडोमने या कंपन्यांना केवळ करारांचे काम पूर्ण करण्यासाठी निधी हस्तांतरित केल्याचा दावा केला असला तरी, बँक व्यवस्थापनाने असा आरोप केला आहे की कराराच्या अटींनुसार सप्टेंबर २०१३ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते, परंतु त्या जागेवर कोणतेही काम झाले नाही.

याव्यतिरिक्त, बँकेने असाही आरोप केला आहे की तिन्ही कंपन्या एका ना कोणत्या प्रकारे ट्रूडोमशी संबंधित आहेत. अरुण नेहरू आणि सेल्वमणी थियागराजन हे इकोडोम पॉवरचे संचालक होते आणि ते एन. रविचंद्रन यांचे पुतणे आहेत.

सेल्वमणी थियागराजन हे बालाजी ट्रेडर्सचे मालक होते, परंतु ते ट्रूडोममध्ये माजी संचालक देखील होते. ट्रेडर्सचे मालक असतानाच ४ कोटी रुपये अन्यत्र वळवण्यात आले.

हेही वाचा :
मला तुरुंगवासाची पर्वा नाही
राहूल गांधीच्या पदयात्रेला युवकांचा प्रतिसाद  

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00