रंगून : म्यानमारच्या मांडले थायलंडची राजधानी बँकॉकला शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या, पूल पडले. रस्ते भेगाळले. काही मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भूकंपाची भयकारी छायाचित्रे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.(Earthquake)
१) भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याने जखमींवर उघड्यावर उपचार करावे लागत आहेत.

२) भूकंपामुळे इमारतींचे अतोनात नुकसान झाले. रस्त्यांवरही प्रचंड मोठा भेगा पडल्या. अनेक ठिकाणी रस्ते खचले.

३) भूकंप इतका शक्तिशाली होता की इमारतीबरोबरच तेथील पूलही जमीनदोस्त झाले. त्यामुळे दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

४) भूकंपामुळे इमारती कोसळून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींमुळे रूग्णालये ओसंडून वाहत आहेत.
