Home » Blog » Dudhsager Falls: पर्यटकांची पावले दूधसागर धबधब्याकडे

Dudhsager Falls: पर्यटकांची पावले दूधसागर धबधब्याकडे

by प्रतिनिधी
0 comments
Dudhsager Falls

बेळगाव : प्रतिनिधी : ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पूर्णक्षमतेने प्रवाहित झाला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने धबधबा पाहण्यासाठी येत आहेत. धबधब्यासमोरून रेल्वे जाताना धबधब्याचे तुषार रेल्वेतील प्रवाशांच्या अंगावर उडतात. अशी वेगळीच मजा अनुभवताना प्रवाशांचा आनंदही द्वीगुणित होताना दिसतो. (Dudhsager Falls)

दूधसागर धबधबा कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवर गोवा राज्यात आहे. तो मांडवी नदीवर आहे. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा घनगर्द पावसाळी वातावरणात प्रवाहीत झालेल्या झालेल्या या धबधब्याचे रूप न्याहाळणे वेगळाच आनंद देणारे ठरते. सध्या शनिवारी आणि रविवारी या परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. (Dudhsager Falls)

विशेषत: ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी तर हा ट्रेक खूपच सुखावतो. कॅसलरॉक स्टेशनवर उतरून चौदा किलोमीटर ट्रेकिंग करत जाणारे अनेक ट्रेकर्स आता दिसत आहेत. हे अंतर कापण्यासाठी साधारण पाच तास लागतात. स्टेशनवर उतरल्यावर दाट आणि ओलसर धुके आपले स्वागत करते. धुक्याची अशी दुलई पांघरूणच चालत धबधब्याकडे जाताना निसर्गाचा अद्भूत नजारा अनुभवायला मिळतो. गोव्यातील कोलेम स्टेशनवर उतरूनही धबधब्याकडे चालत जाता येते. येथूनही चालत जायला साधारण चार ते पाच तास लागतात. पावसाळा व्यतिरिक्त अन्य ऋतुत कोलेम येथून जीपने जाता येते. जीपच्या ड्रॉपिंग पॉइंटपासून केवळ एक किलोमीटर चालत गेले की धबधब्याजवळ पोहोचता येते.

हेही वाचा :
मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडच्या हाती : खरगे
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00