Home » Blog » Dr. Athalye: प्रख्यात सर्जन डॉ. सुभाष आठल्ये यांचे निधन

Dr. Athalye: प्रख्यात सर्जन डॉ. सुभाष आठल्ये यांचे निधन

प्रखर पर्यावरणवादी गेल्याची भावना

by प्रतिनिधी
0 comments
Dr. Athalye

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील प्रख्यात सर्जन डॉ. सुभाष आठल्ये यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. कोल्हापुरातील अनेक सामाजिक चळवळीशी ते संबंधित होते.(Dr. Athalye)  

जनस्वास्थ्य दक्षता समिती, दलित मित्र बापूसो पाटील ग्रंथालय, निसर्ग मित्र परिवार इत्यादी संस्थांचे ते संस्थापक सदस्य होते. शेंडापार्क कुष्ठरोगी वसाहतीतील गरजू रुग्णांची सेवा, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, बालकल्याण संकुल आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ह्या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनाने प्रखर पर्यावरणवादी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Dr. Athalye)  

आयुष्य छान जगण्यासाठी असते. दुसऱ्यांना जगू देण्यासाठी असते. आपण समाजाचा भाग आहोत. त्यामुळे समाजाला जेवढे शक्य असेल तेवढे द्यावे, कृतार्थ जीवन जगावे, अशी त्यांची जीवनाची साधी सरळ व्याख्या होती.

१९६७ पासून कोल्हापूर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यावर त्यांनी २०२२ पर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे आणि सेवाभावी वृत्तीने व्यवसाय केला. १९८३ साली महाराष्ट्रभर विज्ञानयात्रा काढण्यात आली तेव्हा कोल्हापुरातील संयोजन समितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे सामाजिक कार्य अफाट होते. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल त्यांना विशेष कळकळ होती. तापमानावाढीविरोधात ते सतत कृतिशील प्रबोधन करत. त्या आणि इतरही सामाजिक विषयांवर ते सडेतोड प्रश्न मांडत होते. त्यांचे ‘मानव की भस्मासुर’ (मानव जातीची सामुदायिक आत्महत्येकडे वाटचाल) हे पुस्तकही नुकतेच प्रसिद्ध झाले होते. तापमानवाढीपासून पृथ्वी कशी वाचवावी, काय उपाय करायला हवेत यावर विविध संस्थांना ते सतत मार्गदर्शन करत असत. (Dr. Athalye)  

आपल्या राहणीमानाचा पर्यावरणावर ताण नको यासाठी त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असे. अफाट वाचन, चिकित्सक बुद्धी आणि भन्नाट स्मरणशक्ती असे हे व्यक्तिमत्त्व होते. वाचलेले पचवणे सोपे नसते, पण ते अगदी अवघड अशी पुस्तके या वृद्धापकाळात व्यवस्थित लक्षात ठेवत असत. पर्यावरण, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, जेनेटिक्स, ॲटॉमिक एनर्जी, अँथ्रॉपॉलॉजी अशा विविध विषयांवर वाचन आणि त्यावर मार्गदर्शन करत असत. वैद्यकीय व्यवसायातील गैरप्रकारांविषयी त्यांना मनस्वी चीड होती. त्यामुळेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनमध्ये पदाधिकारी असताना चाळीस वर्षांपूर्वी जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना विरुद्ध आवाज उठविला होता. डॉ. आठल्ये यानी फिल्म सोसायटी चळवळी यांसारख्या चळवळीलाही कायम पाठबळ दिले.

हेही वाचा :

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00