Home » Blog » Dongale resigned  : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा

Dongale resigned  : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा

by प्रतिनिधी
0 comments
Dongale resigned

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा आज मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. गुरुवारी, दि. २२  रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये त्यांच्या राजीनामा मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर नवीन अध्यक्षपदाची निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा याची चर्चा सुरू झाली आहे. (Dongale resigned)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राजीनामा देऊ नये असे सांगितल्याने डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर दूध संघांचे नेतृत्व करणारे सर्व नेते आणि संचालक मंडळाने वज्रमूठ बांधून डोंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत डोंगळे यांची बैठक झाली. त्यामध्ये मुश्रीफांनी डोंगळे यांना राजीनामा देण्याची सूचना केली. (Dongale resigned)

मंगळवारी सकाळी डोंगळे यांनी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याकडे राजीनामा दिला. पाटील यांनी डोंगळेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांना दिला. गुरुवारी संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये डोंगळेंचा राजीनामा होण्याची शक्यता आहे.

डोंगळे यांच्यानंतर अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत विश्वास नारायण पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, अमरिश घाटगे, कर्णसिंह गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत. (Dongale resigned)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00