Home » Blog » Disturbed By Visual: दफ्तर घेऊन पळणारी मुलगी आणि कोर्ट…

Disturbed By Visual: दफ्तर घेऊन पळणारी मुलगी आणि कोर्ट…

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

by प्रतिनिधी
0 comments
Disturbed By Visual

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तो पाहणाऱ्या कुणाही संवेदनशील माणसाला वेदना अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे बुलडोझर एका मुलीचे घर पाडून टाकताहेत… ती मुलगी मात्र आपले दफ्तर घेऊन जिवाच्या आकांताने पळत सुटल्याचे हा व्हिडीओ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी या व्हिडीओवर ‘खूपच वेदनादायी,’ अशा भावना बोलून दाखवल्या.( Disturbed By Visual)

अशा घटनांबाबत न्या. भुयान यांनी चिंताही व्यक्त केली.

प्रयागराज विकास प्राधिकरणाने बेकायदेशीररित्या सहा कुटुंबांची घरे पाडली. कलम २१ अंतर्गत त्यांच्या निवाऱ्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचे मत व्यक्त करत, या नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्या. भुयान यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ( Disturbed By Visual)

गेल्या आठवड्यात ‘एक्स’ वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी पुस्तके छातीशी कवटाळून पळत आहे. बाजूला तिची झोपडी तोडण्यात येत आहे, अशा भयंकर प्रसंगी ती पुस्तके घेऊन पळून जातानाचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअरही केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ आंबेडकर नगरच्या जलालपूर येथील अतिक्रमण विरोधी मोहिमेतील आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आंबेडकर नगर पोलिसांनी जलालपूर तहसीलदार न्यायालयाच्या निष्कासन आदेशानुसार गावातील जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी हे पाडकाम करण्यात आल्याचे म्हटले आहे. ( Disturbed By Visual)

पोलिसांनी सांगितले की, अनिवासी बांधकामे हटवण्यापूर्वी अनेक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ही कारवाई सरकारी जमीन परत मिळवण्याच्या महसूल न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून करण्यात आली होती, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

दरम्यान, प्रयागराज प्रकरणात ज्या सहा अपीलकर्त्यांची घरे बेकायदेशीरपणे पाडण्यात आली होती त्यांना भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर व्हायरल व्हिडीओवर न्यायमूर्ती भुयान यांनी वक्तव्य केले. न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने प्रयागराजमधील कारवाई ‘अमानवीय आणि बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :
सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराज प्राधिकरणाचे उपटले कान
पास्टरला जन्मठेपेची शिक्षा

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00