Home » Blog » विकास कामांवरील चर्चेस कुठेही तयार : राजेश क्षीरसागर

विकास कामांवरील चर्चेस कुठेही तयार : राजेश क्षीरसागर

शिवाजी पार्क येथील मेळाव्यास नागरिकांचा प्रतिसाद

by प्रतिनिधी
0 comments
Rajesh Kshirsagar file photo

कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. २०१४ पर्यंत राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा सवाल कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी करत हिम्मत असेल तर विरोधकांनी विकासकामावर बोलावे. विकास कामांवर चर्चेला कुठेही बोलवा मी तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

शिवाजी पार्क येथील गद्रे बाल उद्यनातील मेळाव्यात ते बोलत होते. राजेश क्षीरसागर म्हणाले, काँग्रेसचे नेते गृह राज्यमंत्री होते. जिल्ह्याचे पालकमंत्री होते. महानगर पालिकेतही त्यांचीच सत्ता होती. त्यांच्या काळात शहराच्या विकासासाठी त्यांनी काय ते केले सांगावे . आमदारकी नसतानाही मी शहरात केलेली विकासकामे पाहून त्यांना पोटशूळ उठले असल्याचे ते म्हणाले.

मी शहरातील पूर नियंत्रणासाठी ३२०० कोटी मंजूर करून आणले. रंकाळा परिसराच्या विकासासाठी २५ कोटी रुपये आणले. रस्त्यांसाठी १०० कोटी मंजूर झाले. केशवराव भोसले नाटय़गृहाची दुर्दैवी घटना घडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्याच दिवशी कोल्हापुरात आले. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तातडीने २५ कोटी रुपये जाहीर केले. चोवीस तासात निधीही मंजूर केला. त्याचे कामही खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते सुरू झाले आहे. आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन केल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, आशिष ढवळे, अनिता ढवळे, विश्वजीत मोहिते, विजयेंद्र घाटगे, मुकुंद सावंत, श्रीकांत कुलकर्णी,  राजेंद्र तोडकर, शिल्पा घोडके, अनुराधा मोहिते, संदीप गद्रे, नीरज झंवर , नितीन सासने, योगेश भाटेजा, शक्ती मोहिते, संजय लकडे, संदीप चिगरे, अमोल कापसे, मित्तुर शाह, संजय शेट्ये, अविनाश नाईक, संपत कांबळे, जयवंत गायकवाड, संजय मांडवकर, मनीषा आंबूपे, माधुरी शेट्ये, अनिता बुकशेट,सुनील बुकशेट , कुमार बुकशेट,केदार शेळके,सौरव माने, सौरभ शेलार आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00