कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (५ मे) दिलबहार तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर १-० अशी मात केली. या संघाने पुढील फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘दिलबहार’च्या आयुष पाटील याची सामनावीर म्हणून निवड झाली.()DeelBaharDeelBahar
पूर्वार्धात पाटाकडील आणि फुलेवाडी संघाने आघाडी मिळवण्यासाठी सूत्रबद्ध चढाया केल्या. ‘दिलबहार’कडून आयुष पाटील, अजीज मोमीन, रोहन दाभोळकर, प्रतीक कांबळे तर ‘फुलेवाडी’ कडून विराज साळोखे, शुभम देसाई, सिद्धेश साळोखे, अक्षय मंडलिक, प्रवीण साळोखे यांनी जोरदार चढाया केल्या. पण अचूक समन्वयअभावी गोल होऊ शकला नाही. मध्यंतरास सामना शून्य गोल बरोबरीतच होता.
उत्तरार्धात आघाडी मिळण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले. ५२ व्या मिनिटाला दिलबहार तालीम मंडळाने यशस्वी चाल रचली. आयुष पाटीलच्या पासवर आझिझ मोमीनने गोल नोंदवत दिलबहार संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी फुलेवाडी संघाने जोरदार आक्रमणे केली, पण दिलबहार संघाने भक्कम बचाव ठेवत गोल होऊ दिला नाही. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवून ‘दिलबहार’ने सामना जिंकला.
गुरुवारचा सामना : झुंजार क्लब वि. संध्यामठ तरुण मंडळ, दुपारी ४.०० वाजता.
हेही वाचा :
स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त
टेबल टेनिसपटू शरथची निवृत्तीची घोषणा