Home » Blog » World Economic Forum दावोसमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार

World Economic Forum दावोसमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार

by प्रतिनिधी
0 comments
World Economic Forum

दावोस :
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये जाऊन रिलायन्स समूह, लार्सन अँड टुब्रो, टाटा, कल्याणी, हिरानंदानी समूह आदींशी करार केले आहेत. इथल्या कंपन्यांशी दावोसमध्ये जाऊन करार करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. (World Economic Forum)

दावोसमधील दोन दिवसांच्या करारांमधून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले. (World Economic Forum)

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या दोन दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत. (World Economic Forum)

टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.(World Economic Forum)

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300
21) सिएट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : नागपूर

22) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 24,437 कोटी
रोजगार : 33,600
कोणत्या भागात : रत्नागिरी

23) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : 30,000 कोटी

24) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : 10,000 कोटी

25) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 15,299 कोटी
रोजगार : 4000

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 15,000 कोटी
रोजगार : 1000

27) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 6500 कोटी
रोजगार : 1300

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक: 20,000 कोटी
रोजगार : 20,000

29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक: 3000 कोटी
रोजगार : 1000

30) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट
गुंतवणूक: 3,05,000 कोटी
रोजगार : 3,00,000

32) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 10,319 कोटी
रोजगार : 3200
कोणत्या भागात : चंद्रपूर

33) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : 42,535 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : नागपूर

34) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : 21,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : रायगड

35) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूक: 10,200 कोटी
रोजगार : 3000
कोणत्या भागात : रायगड

36) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक: 8641 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

37) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

38) सिलॉन बिव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 1039 कोटी
रोजगार : 450
कोणत्या भागात : अहिल्यानगर

39) लासर्न अँड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : 10,000 कोटी
रोजगार : 2500
कोणत्या भागात : तळेगाव

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूक: 450 कोटी
रोजगार : 1100
कोणत्या भागात : एमएमआर

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : 12,780 कोटी
रोजगार : 2325
कोणत्या भागात : नागपूर

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : 14,652 कोटी
रोजगार : 8760
कोणत्या भागात : नागपूर

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोननिर्मिती
गुंतवणूक : 300 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : जालना

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 5000 कोटी
रोजगार : 1300
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

45) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : बुटीबोरी

46) टॉरल इंडिया
क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 1200
कोणत्या भागात : अहिल्यानगर

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

48) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 51,600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

49) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 8600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

50) अ‍ॅमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : 71,795 कोटी
रोजगार : 83,100
कोणत्या भागात : एमएमआर

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

52) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर
…………
दि. 22 जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी
एकूण रोजगार : 15.75 लाख

हेही वाचा :
महाराणी ताराबाईंवर द्विखंडात्मक ग्रंथ

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00