नवी दिल्ली : भारतीय टेनिस संघाने डेव्हिस कपच्या ‘वर्ल्ड ग्रुप-१’मधील स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. ‘वर्ल्ड ग्रुप-१’च्या प्ले-ऑफ लढतींमध्ये भारताने टोगोवर ४-० अशी एकतर्फी मात केली. (Davis Cup)
दिल्लीतील डीएलटीए क्रीडा संकुलामध्ये १ व २ फेब्रुवारी रोजी भारत-टोगो लढती झाल्या. शनिवारी झालेले एकेरीचे दोन्ही सामने भारतीय टेनिसपटूंनी जिंकून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या सामन्यात भारताच्या शशीकुमार मुकुंदने टोगोच्या लिओव्हा आईते अजाव्होनवर ६-२, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. दुसरा सामना भारताच्या रामकुमार रामनाथनने टोगोच्या थॉमस याका कोफी सेतोदजीविरुद्ध ६-०, ६-२ असा जिंकला. (Davis Cup)
आव्हान जिवंत ठेवण्यासाठी रविवारी टोगोला दुहेरीचा सामना जिंकणे आवश्यक होते. तथापि, एन. श्रीराम बालाजी-ऋत्विक चौधरी बोल्लिपल्ली या भारताच्या जोडीने मलापा तिंगोऊ ओकोम्लो-होडाबालो इसाक पॅडिओ यांचे आव्हान ६-२, ६-१ असे परतावले. भारतीय जोडीने अवघ्या ५६ मिनिटांमध्ये हा सामना जिंकून संघाला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतातर्फे डेव्हिस कपमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या करण सिंगने परतीच्या एकेरी लढतीत होडाबालो इसाक पॅडिओचा ६-२, ६-३ असा पराभव केला. परतीचा दुसरा सामना न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भारताने ४-० अशा विजयासह वर्ल्ड ग्रुप-१मधील स्थान कायम राखले. (Davis Cup)
भारतीय टेनिस संघाने डेव्हिस कपच्या ‘वर्ल्ड ग्रुप-१’मधील स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. ‘वर्ल्ड ग्रुप-१’च्या प्ले-ऑफ लढतींमध्ये भारताने टोगोवर ४-० अशी एकतर्फी मात केली.
Historic Win For INDIA
#TeamIndia defeated Togo by 3-0 in #DavisCup World Group 1 playoffs
pic.twitter.com/DTgiSyWZLr
— Doordarshan Sports (@ddsportschannel) February 2, 2025
हेही वाचा :
अंतरराळातून सुनीता विल्यम्स लवकर येणार!