Home » Blog » हरियाणात काँग्रेसची लाट; जम्मू-काश्मिरमध्येही भाजपला धक्का

हरियाणात काँग्रेसची लाट; जम्मू-काश्मिरमध्येही भाजपला धक्का

Elections : एक्झिट पोलचे अंदाज जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
एक्झिट पोलचे अंदाज जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस तर जम्मू-काश्मिरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सर्वांधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हरियाणा विधानसभेत काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा निष्कर्ष बहुतेक सर्व सर्वेक्षणांत व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. (Elections)

हरियाणात ९० जागांसाठी १०३१ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. त्यांमध्ये १०१ महिला उमेदवार आहेत. येथे काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय लोकदल आणि जननायक जनता पार्टी हे प्रमुख पक्ष रिंगणात होते.

जम्मू-काश्मिर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. येथील एक्झिट पोलनुसार, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे दिसते. तथापि, काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपचे हॅट्ट्रिकचे स्वप्न धुळीला…

हरियाणात ९० जागांसाठी अत्युंत चुरशीने झालेल्या बहुचर्चित निवडणुकीत हॅट्ट्रिक साधण्याच्या भाजपच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील सलग दोन विजयानंतर यंदा तिसरा विजय संपादन करून हॅट्ट्रिक साधू, अशी आशा बाळगून भाजप निवडणूक रिंगणात उतरला होता. निवडणुकीपूर्वी तेथे राज्यातील नेतृत्वही बदलण्यात आले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायबसिंग सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तथापि, नेतृत्वबदलाच्या या प्रयोगाचा निकालावर अनुकूल परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे दहा वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसचे सत्तेकडे पुनरागमन होत असताना मुख्यमंत्रिपदासाठी भूपिंदर सिंग हुडा हे प्रबळ दावेदार मानले जातात. (Elections)

जम्मू-काश्मिरमध्ये मतदारांचा उत्साह

दरम्यान, जम्मू-काश्मिरची यावेळची निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक मानली जात आहे. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारने कलम ३७० हटवले आणि जम्मू-काश्मिर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केले. त्यानंतर झालेली ही निवडणूक मतदारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उल्लेखनीय ठरली आहे. जम्मू विभागातील उधमपूर, कठुआ आणि सांबा येथे ७० टक्क्यांहून अधिक मतदानाचा विक्रम नोंदला गेला. आज शेवटच्या टप्प्यात उधमपूर येथे ७६.०९ टक्के मतदान झाले. काश्मिर खोऱ्यातील बारामुल्ला, सोपोर यांसारख्या विभाजदनवाद्यांचे पूर्वापार वर्चस्व असलेल्या मतदारसंघांतही आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

विविध सर्वेक्षणानुसार, हरियाणाचे अंदाज

एक्झिट पोल – काँग्रेस – भाजप- जेजेपी – राष्ट्रीय – लोकदल इतर

इंडिया टुडे-सी व्होटर — ५०ते५८, २०ते२८, — ,– १०ते१६

दैनिक भास्कर — ४४ते५४, १९ते२९, ०ते१, १ते५, ४ते९

रिपब्लिक मॅट्रिज — ५५ते६२, १८ते२४, ०ते३,  ३ते६, २ते५

पीपल्स पल्स  — ५५, २६, ०ते१ ,२ते३, ३ते५

विविध सर्वेक्षणानुसार, जम्मू-काश्मिरचे अंदाज

एक्झिट पोल – काँग्रेस – भाजप – नॅ. काँ. +काँग्रेस – पीडीपी इतर

इंडिया टुडे- सी व्होटर — २७ ते ३२, ४०ते४८, ६-१२, ६-११

दैनिक भास्कर — २०ते२५, ३५ते४०, ४ते७, १२ते१६

पीपल्स पल्स — २३ते२७, ४६ते५०, ७ते११, ४ते५

गुलिस्ताँ न्यूज — २८ते३०, ३१ते३६, ५ते७, ८ते१६

एक्झिट पोल म्हणजे काय?

एक्झिट पोल अर्थांत मतदानोत्तर चाचणी प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान केली जाते. सर्व टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातात. एक्झिट पोल घेणाऱ्या यंत्रणांचे प्रतिनिधी मतदान करून मतदान केंद्राबाहेर आलेल्या मतदारांना प्रश्न विचारून त्यांचा कल जाणून घेतात. मतदारांनी दिलेल्या उत्तरावर आधारित निष्कर्ष आणि अनुमान काढले जाते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00