Home » Blog » Congress slams on waqf: उद्योगपती, बिल्डरांना जमिनी देण्याचा डाव

Congress slams on waqf: उद्योगपती, बिल्डरांना जमिनी देण्याचा डाव

हर्षवर्धन सपकाळ यांचा ‘वक्फ’ विधेकावरून आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Congress slams on waqf

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहते. ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (२ एप्रिल) केला. धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. शक्तिपीठ मार्गाच्या नावाखाली कोकणपट्टा अदानी अंबानीला देण्याचा आट घातला जात आहे, तसाच हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. (Congress slams on waqf)

संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिले आहेत. मंदिर, प्रार्थनास्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार दिलेले आहेत. देशात भूमिहिनांची संख्या जास्त होती, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवून हजारो एकर जमीन जमा करून भूमिहिनांना दिली. पंडित नेहरु यांनी ‘कसेल त्याची जमीन’ म्हणत कूळ कायदा आणला. नंतर सिलिंगचा कायदा आणला, इंदिरा गांधी यांनी जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला, तर युपीए सरकार असताना आदिवासींना वन जमिनीचा हक्क दिला, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले. (Congress slams on waqf)

हायुतीचे नेते ‘गजनी’ झाले

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते. हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा ‘गजनी’ झाल्याचा प्रकार आहे. पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. (Congress slams on waqf)

अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेताच गुंडाळले. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली. (Congress slams on waqf) 

खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदाराला वाढदिवसाची भेट म्हणत त्यांनी सही करत ‘सुप्रमा’ दिली होती पण आता ते होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली  आहे. याच पाण्याच्या प्रश्नावरून तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला.

मोदींची खुर्ची डळमळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षानंतर ३० मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला भेट दिली. आपली खुर्ची धोक्यात आल्यामुळेच  मोदी यांना आरएसएसची आठवण आली असावी, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00