Home » Blog » Circuit Bench Kolhapur : पालकमंत्री आबिटकरांकडून सर्किट बेंच इमारत कामांची पाहणी

Circuit Bench Kolhapur : पालकमंत्री आबिटकरांकडून सर्किट बेंच इमारत कामांची पाहणी

by प्रतिनिधी
0 comments
Circuit Bench Kolhapur

कोल्हापूर  : प्रतिनिधी : जुन्या न्यायालयाच्या इमारतीवर ‘हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच कोल्हापूर’ चा फलक झळकला. १७ ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन होणार असून  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला १८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. (Circuit Bench Kolhapur)

जुना जिल्हा न्यायालय आणि राधाबाई बिल्डिंग आणि परिसरातील इमारतीचे बांधकाम कामांची पाहणी केली. आबिटकर यांनी तिन्ही इमारतीमध्ये सुरू असलेल्या कामांना भेट देऊन उभारण्यात तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. येत्या १८ ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार असल्याने इमारतींचा ताबा न्यायालयाकडे ११ ऑगस्टला देणे आवश्यक असून, याबाबत पुढील तीन दिवसांत इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यवस्था लोकांना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या होत्या. सर्किट बेंच कोल्हापूरात सुरू झाल्याने आपल्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. येत्या १८ ऑगस्टला हा बेंच प्रत्यक्षात सुरू होताना कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल. (Circuit Bench Kolhapur)

जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहण येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. इंद्रजित चव्हाण, टी. एस. पाडेकर, व्ही. आर. पाटील, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते. (Circuit Bench Kolhapur)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00